तालुकास्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत भूषण, निरंजन, पुष्कराज यांची चमकदार कामगिरी

पुणे : फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या भूषण केणी, निरंजन पोकळे आणि सिंहगड कॉलेजच्या पुष्कराज पोकळे यांनी जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत विजेतेपद पटकावले. नºहे येथील जाधवर शिक्षण संकुलात ही स्पर्धा झाली.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस्चे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर जाधवर आणि उपाध्यक्ष शार्दूल जाधवर यांच्या हस्ते झाला. यावेळी दत्तात्रय साळुंखे, दिनेश शिर्के, अमोल तोडणकर, अविनाश विश्वब्राह्मण, मलसिद्ध कुमटाळे उपस्थित होते.

निकाल : १९ वर्षांखालील मुले : ४६ किलो खालील – भूषण केणी (नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूल, फुलगाव), जय मुटे (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव). ४६ ते ५० किलो खालील –  ऋत्विक पोतले (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव), सुशांत विभूते (पृथ्वीराज कपूर मेमोरियल ज्युनियर कॉलेज), अनिकेत शेगोळर (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव). ५० ते ५४ किलो खालील – निरंजन पोकळे (सिंहगड कॉलेज, आंबेगाव), शंकर तोडकर (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव). ५४ ते ५८ किलो खालील – तेजस आबनावे (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव), सुजित गावडे (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव). ५८ ते ६२ किलो खालील – सतीश बानपत्ते (शास्त्रीय जैन संघटना), श्रीकांत डफळ (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव), सोहम धनावडे (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव). ६२ ते ६६ किलो खालील – जिग्नेश काछडिया व शुबिशल रजीब पाल (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव). ६६ ते ७० किलो खालील – कानीफनाथ पोकळे (सिंहगड कॉलेज, आंबेगाव), कुणाल कोद्रे व तन्मय मदनकर (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव). ७० किलोवरील – पुष्कराज पोकळे (सिंहगड कॉलेज), प्रसाद घोलप व रतीश पिल्ले (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव).

१७ वर्षांखालील मुले : ३५ किलो खालील – अनिकेत मुजुमले (शिवाभूमी विद्यालय, खेडशिवापूर), तबरेज जमादार (पूनावाला मेमोरीयल हायस्कूल), विकास राजपूत (भारतीय जैन संघटना). ३५ ते ३८ किलो खालील – अमेय पिसे (ब्लॉसम पब्लिक स्कूल, नºहे), जतीन वाघ (नेताजी स्कूल, फुलगाव). ३८ ते ४१ किलो खालील – चैतन्य भवारी (नेताजी स्कूल, फुलगाव), निकुंज पुरोहित (पूनावाला मेमोरियल हायस्कूल), सुजित देशमुख (अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल). ४१ ते ४४ किलो खालील – सौरभ जगताप (नेताजी स्कूल, फुलगाव), ऋषीकेश खशबी (नेताजी स्कूल, फुलगाव). ४४ ते ४८ किलो खालील –  प्रद्युम्न लोंढे (नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल), ऋषीकेश गावडे (नेताजी स्कूल, फुलगाव), अथर्व कोंद्रे (नेताजी स्कूल, फुलगाव), अभिराज खाटपे (शिवभूमी विद्यालय). ४८ ते ५२ किलो खालील-शुभम पवार (नेताजी स्कूल, फुलगाव), प्रसाद राजन (नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल), अथर्व (सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल), मेघ शर्मा (नेताजी स्कूल, फुलगाव). ५२ते ५६ किलो खालील – शुभम रासकर, अक्षय हिंगे (नेताजी स्कूल, फुलगाव), राजू चव्हाण (श्री संत तुकाराम, लोहगाव), रोहित परिहार (ए.ई.एस. हॉरिझॉन स्कूल). ५६ ते ६० किलो खालील – कौस्तुभ मोरे (ए. ई. एस. हॉरिझॉन स्कूल), साईराज कदम (नेताजी स्कूल, फुलगाव), रोहित मुळे (नेताजी स्कूल, फुलगाव), प्रकाश कांबळे (विष्णूजी शकुंजी हायस्कूल). ६० ते ६४ किलो खालील – मयुर जवळकर, कार्तिक कोंडे (नेताजी स्कूल, फुलगाव), अर्णव शेळके, ओंकार कचरे (पूनावाला मेमोरियल स्कूल). ६४ किलोवरील – दिग्वीजय माने, निखिल भालेराव (नेताजी स्कूल, फुलगाव),आशुतोष चिल्लल (ब्लॉसम पब्लिक स्कूल), सय्यद फजल (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल).