भुवनेश्वर कुमारला वनडे कारकिर्दीत मैलाचा दगड पार करण्याची संधी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून (१२ जुलै) सुरु होत आहे. या मालिकेत भुवनेश्वर कुमारला वनडेत १०० विकेट्स घेण्याची मोठी संधी आहे.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल असलेल्या इंग्लंड आणि द्वितीय स्थानी असलेल्या भारतीय संघात आज नॉटींगहम येथिल टेंटब्रीज क्रिकेट मैदानावर या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.

भारताच्या या इंग्लंड दौऱ्यातील टी-२० मालिकेत भारताने इंग्लंडला २-१ असे पराभूत करत  टी-२० मालिका आपल्या नावे केली आहे.

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ विजय प्राप्त करुन इंग्लंडवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करेल.

भुवनेश्वर कुमारने आजपर्यंत वनडेत ८६ वनडेत ९० विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने ३८.३१च्या सरासरीने विकेट्स घेताना दोन वेळा ४ तर एकदा डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.

या मालिकेत त्याने १० विकेट्स घेतल्या तर वनडेत भारताकडून १०० विकेट घेणारा १९वा गोलंदाज बनणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-फिफा विश्वचषक २०१८: पराभवानंतर वार्नर-गंभीरने इंग्लंडला केले ट्रोल

-भारताची तुलना आॅस्ट्रेलियाशी करणे चुकिचे -जो रुट