ऍरॉन फिंचची विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा दिग्गजांच्या यादीत समावेश

सि़डनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आज (12 जानेवारी) पहिला वनडे सामना सुरु आहे. हा सामना सि़डनी क्रिकट ग्राउंडवर होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिला धक्का लवकर दिला. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचला 6 धावांवर असताना तिसऱ्याच षटकात त्रिफळाचीत केले.

याबरोबरच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेण्याचा टप्पाही गाठला आहे. फिंच ही भुवनेश्वरची 100 वी विकेट ठरला. वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट्स किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भुवनेश्वर एकुण 12 वा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.

हा टप्पा गाठण्यासाठी त्याला 96 सामने लागले आहेत. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो 5 व्या क्रमांकावर आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर सौरव गांगुली असून त्याने 308 सामन्यात 100 विकेट्स घेतल्या होत्या.

वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक वनडे सामने खेळणारे भारतीय खेळाडू-

308 सामने – सौरव गांगुली

268 सामने – सचिन तेंडुलकर

266 सामने – युवराज सिंग

100 सामने – रवी शास्त्री

96 सामने – भुवनेश्वर कुमार

85 सामने – व्यंकटेश प्रसाद, रविंद्र जडेजा

भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज – 

315 विकेट्स  – जवागल श्रीनाथ

288 विकेट्स – अजित अगरकर

269 विकेट्स – झहीर खान

253 विकेट्स – कपिल देव

196 विकेट्स – व्यंकटेश प्रसाद

173 – इरफान पठाण

157 विकेट्स – मनोज प्रभाकर

155 विकेट्स – आशिष नेहरा

115 विकेट्स – इशांत शर्मा

106 विकेट्स – उमेश यादव

100 विकेट्स – सौरव गांगुली

100 विकेट्स – भुवनेश्वर कुमार

महत्त्वाच्या बातम्या-

अँडी मरेची यावर्षीची विंब्लडन असेल शेवटची स्पर्धा

अखेर केएल राहुल, हार्दिक पंड्याला परतावे लागणार मायदेशी, कॉफी विथ करन प्रकरण अंगलट

विराट कोहली, रवी शास्त्रींसाठी ही आहे आनंदाची बातमी