भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमधून सावरला असुन त्याची भारतीय अ संघात निवड झाली आहे. गेले काही आठवडे हा खेळाडू दुखापतीमुळे कसोटी संघाबाहेर होता.

तो अलुरला होणाऱ्या भारत अ विरु्दध दक्षिण आफ्रिका सामन्यात २९ आॅगस्टला भाग घेणार आहे. चौरंगी मालिकेतून हे दोन्ही संघ बाहेर गेल्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकासाठी उद्या खेळणार आहेत.

हा खेळाडू भारत विरुद्ध इंग्लंड दौऱ्यातून बाहेर गेल्यामुळे त्याचा फटका संघाला गौोलंदाजी तसेच काही प्रमाणात फलंदाजीतही बसला.

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भुवीला दुखापतीचा सामना करावा लागला. तेव्हापासून हा खेळाडू संघातून बाहेर आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात या खेळाडूला संधी देणार की नाही हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे.

भारत इंग्लंड दौऱ्यानंतर एशिया कपमध्ये खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारताच्या सुधा सिंगने पटकावले स्टिपलचेसमध्ये रौप्यपदक

एशियन गेम्स: निरज चोप्राने भारताला मिळवून दिले भालाफेकीतील पहिले सुवर्णपदक

एशियन गेम्स: धरूण अय्यास्वामीने जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक