या कारणामुळे घेतली भुवी, धवनने कसोटी मालिकेतून माघार

कोलकाता । शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांना भारतीय कसोटी संघातून वैयक्तिक कारणांमुळे मुक्त करण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमार येत्या २३ तारखेला लग्न करणार असल्यामुळे तर शिखर धवनने माघार घेण्याचे कारण वैयक्तिक सांगितले आहे.

भुवनेश्वर कुमार श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही तर शिखर धवन फक्त दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल परंतु तो तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असल्याचे त्याने सांगितले आहे.

भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात तामिळनाडूच्या अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला संधी देण्यात आली आहे.जर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने पुन्हा तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला तर उमेश यादवला संधी मिळू शकते. शिखर धवनच्या जागी भारताचा पूर्णवेळ सलामीवीर मुरली विजय नागपूर कसोटीने संघात कमबॅक करू शकतो.

दुसऱ्या कसोटीसाठी यातून निवडला जाणार भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विजय शंकर, रोहित शर्मा, वृद्धिमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा.