भुवनेश्वर कुमारचे ट्विटरवर झाले १ मिलियन फॉलोवर्स

0 357

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारने ट्विटरवर चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे. त्याला ट्विटरवर १ मिलियन फॉलोवर्स झाले आहेत.

त्याने त्याचा एक फोटो  ट्विटरवर पोस्ट करून लिहिले आहे की “१ ते १ मिलियन. सगळ्यांचे धन्यवाद. मी तुमच्यातील प्रत्येकापर्यंत पोहचू शकत नाही पण तुमच्या अखंड पाठिंब्याचे कौतुक करतो.”

भुवनेश्वर आत्तापर्यंत १८ कसोटी, ७६ वनडे आणि २० टी २० सामने खेळला आहे. त्याने कसोटीत एकूण ४५ बळी घेतले आहेत. तर वनडेत ८१ बळी घेतले आहेत आणि टी २० मध्ये १९ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर त्याची कसोटीत फलंदाजी करताना ३ अर्धशतके आहेत आणि वनडेत १ अर्धशतक आहे.

भुवनेश्वर सध्या न्यूजीलँड विरुद्ध चालू असलेल्या वनडे मालिकेत व्यस्त आहे. २५ ऑक्टोबरला भारताची पुण्यात २ री वनडे होणार आहे. पहिला वनडे भारताने काल हरला होता.

Comments
Loading...
%d bloggers like this: