पुनरागमनाच्या सामन्यात भुवीचा दक्षिण आफ्रिकेला दणका!

अलुर | चौरंगी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात आज भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघावर तब्बल १२४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून जबरदस्त गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने ९ षटकांत ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २७५ धावा केल्या. यात श्रेयस अय्यर ६७ आणि अंबाती रायडू ६६ यांच्या शतकांचा समावेश होता.

२७६ धावांचे लक्ष मैदानात घेऊन आलेल्या आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांसमोर ३७.१ षटकांत सर्वबाद १५१ धावा करता आल्या. यात भारताकडून भुवनेश्वर कुमारने ३, दीपक चहर आणि मयांक मार्केंडेने प्रत्येकी दोन तर खलील अहमद आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी १ विकेट घेतली.

भुवनेश्वर कुमार सध्या दुखापतीमुळे कसोटी संघाबाहेर आहे. फीट झाल्यामुळे त्याची भारत अ संघात निवड करण्यात आली होती. या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केल्यामुळे पाचव्या कसोटी सामन्यासाठी त्याला टीम इंडियात संधी मिळते का? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक

 …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…

 आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी