कोण आहे भुवनेश्वर कुमारची गर्ल फ्रेंड ?

भारताचा स्टार गोलंदाज आणि आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणारा सनरायझर्स हैद्राबादचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. भुवनेश्वर कुमारने ११ मे रोजी त्याच्या इंस्टाग्रामच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो टाकला ज्यात तो एका हॉटेलमध्ये बसला आहे आणि समोरच्या व्यक्तीचा फोटो त्याने क्रॉप केला होता. फोटोच्या खाली त्याने लिहले होते ” डिनर डेट फुल्ल फोटो सून” . याचा अर्थ असा की तो ज्या व्यक्तीसोबत होता त्याची ओळख त्याला आताच सगळयांना सांगायची नव्हती . तो पूर्ण फोटो लवकरच प्रसिद्ध करेल.

Dinner date 😊 full pic soon 😉

A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi) on

सोशल मीडियावरील काही पोस्टनुसार ही व्यक्ती म्हणजे मॉडेल आणि तेलगू अभिनेत्री अनुस्म्रीती सरकार . अनुस्म्रीती आता एका बॉलीवूड सिनेमात काम करण्यासाठी मुंबईत आली होती. या दोघांचा फोटो काढण्याचा प्रयत्न जेव्हा करण्यात आला तेव्हा भुवीने लपण्याच्या प्रयत्न केला .

भुवनेश्वरने या बातमीबद्दल इंस्टग्रामवर एक पोस्ट टाकली आहे ज्यात त्याने असे सांगितले आहे की हि फक्त एक अफवा आहे आणि ती व्यक्ती अनुस्म्रीती सरकार नाही , त्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा मी स्वतः वेळ आल्यावर करेल, तो पर्यंत कोणतीही अफवा पसरवू नका.

सिनेअभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांची जवळीक भारतीय क्रिकेट रसिक आणि सिनेचाहत्यांना काही नवीन नाही. आताच झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी गेल्याच आठवड्यात साखरपुडा केला, तसेच युवराज सिंग आणि हेझल किच यांनी या वर्षीच्या सुरवातीला लग्न केले आहे. गीता बास्रा आणि हरभजन सिंग यांना या वर्षीच एक मुलगी झाली आहे. भारताची सर्वाधिक आवडती जोडी म्हणजे विराट आणि अनुष्का तर आहेतच, ते ही आजकाल सोशल नेटवर्किंग साईटवर फोटो टाकत असतात.