भुवनेश्वर कुमार करतोय नेटमध्ये गोलंदाजी; भारतीय संघाला मोठा दिलासा, पहा व्हिडिओ

मॅनचेस्टर। भारतीय संघ 2019 विश्वचषकातील त्यांचा सहावा सामना गुरुवारी(27 जून) विंडीज विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी भारताचा दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीचा सराव केला आहे. त्यामुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.

त्याच्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘पहा, नेटमध्ये कोण परत आले आहे.’

भारताच्या खेळाडूंनी आज(25 जून) मॅनचेस्टरमध्ये पाऊस पडत असल्याने इनडोअर सराव करण्यास पसंती दिली आहे. यावेळी भुवनेश्वर कुमारने जवळ जवळ 30 मिनीटे गोलंदाजी केली. त्याच्यावर भारताचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हाट लक्ष ठेऊन होते.

भुवनेश्वरला 16 जूनला पाकिस्तान विरुद्ध खेळताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. या सामन्यात तो 2.4 षटके गोलंदाजी केल्यानंतर मैदानाबाहेर गेला होता.

तसेच तो 22 जूनला झालेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याला या दुखापतीमुळे मुकला होता. त्याच्याऐवजी मोहम्मद शमीने या सामन्यात गोलंदाजी केली. शमीने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हॅट्रिकही घेतली होती.

भुवनेश्वरने आज सराव सत्रात जरी भाग घेतला असला तरी तो विंडीज विरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे. भारतीय संघ त्याला सावधगिरी म्हणून विंडीज विरुद्धच्या सामन्यात आराम देऊ शकतात.

याबरोबरच भारताने नेटमध्ये फलंदाजांना सराव देण्यासाठी नवदिप सैनीला नेट बॉलर म्हणून इंग्लंडला बोलावून घेतले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

तब्बल १ वर्षाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या वॉर्नरचे नाव आता सन्मानाने सचिन-हेडनच्या यादीत घेतले जाणार

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या प्रशिक्षकाची आत्महत्या करण्याची होती इच्छा

वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल