- Advertisement -

Video: क्रिकेटमध्ये असा झेल पाहिलाय का?

0 710

बिग बॅशमधील ऍडलेड स्ट्राईकर्स आणि मेलबर्न रेनगडेस सामन्यात एक अप्रतिम झेल क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. या झेलचे वर्णन समालोचकांनी “the best catch you’ll ever see” असे केले आहे.

जेव्हा मेलबर्नकडून विंडीजचा अष्टपैलू खेळाडू डवायने ब्रावोने रशीद खानच्या गोलंदाजीवर हवेत चेंडू मारला तेव्हा बेन लौघालींने सीमारेषेच्या बाहेर जात झेल घेतला परंतु हवेत उडी घेत झेल दुसऱ्या खेळाडूकडे फेकला. यावेळी जेव्हा त्याने धावत जात झेल घेतला तेव्हा त्याचे त्यावरील नियंत्रण सुटले होते. म्हणून त्याने सीमारेषेवर जात चेंडू मागे फेकला.

यावेळी जॅक वेटहेराल्ड याने अतिशय चपळाई करत सूर मारत हा झेल पकडला. यावेळी त्या दोघांनी घेतलेल्या कष्टामुळे हा झेल झाला.

Video: 

Comments
Loading...
%d bloggers like this: