राष्ट्रीय स्पर्धेसाठी बिहार संघाची घोषणा, प्रो कबड्डीमधील हा खेळाडू करणार नेतृत्व  

पटणा। ६५ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी बिहारने आपल्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा केली. ही स्पर्धा ३१ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत  हैद्राबाद येथील गाचीबोवली इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.

बिहार पुरुष संघाच्या कर्णधारपदी स्टार खेळाडू अजय कुमार असून महिला संघाच्या कर्णधारपदी रेमी कुमारी ही असणार आहे. याबाबतची  घोषणा बिहार कबड्डी संघाचे सचीव कुमार विजय यांनी निवड समितीच्या समोर केली. 

पटणा येथील जिल्हा क्रीडाअधिकारी संजय कुमार यांनी संघाला पुढील वाटचालीसाठी गुलाबपुष्प देऊन येत्या नवीन वर्षात बिहार राज्याचे नाव कबड्डीच्या सुवर्ण इतिहासात नोंदवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

 पुरुष संघ- अजयकुमार (कर्णधार), परवेश,गौतम, अमनकेश, नवीन, मोहित, अनुप सिंह(पूर्व मध्य रेल्वे), नीलकमल,अभिनव, प्रवीण, भवेस (बेगुसराय), रंजीत (बक्सर). 

प्रशिक्षक-राजीव कुमार सिंघ , संघ व्यवस्थापक- निरंजन कुमार.  

महिला संघ- रेमी कुमारी(कर्णधार), कोमल, श्वेता (बेगुसराय), सोनिया, शिखा, मीना, हरप्रीत कौर, शीना (पूर्व मध्य रेल्वे), शमा परवीन, कोमल देवंती (पटणा), बबली (भोजपूर). 

प्रशिक्षक -अमित कुमार (पटणा), व्यवस्थापक – नितेश कुमार