बर्मिंघम शहराला मिळाला २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धाेच्या आयोजनाचा मान

0 1,390

२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमान पद २०१५ साली दक्षिण अफ्रीकेच्या डरबन शहराला मिळाले होते.

पण या वर्षीच्या सुरुवातीलाच दक्षिण अफ्रीकेने अर्थिक अडचणीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातून माघार घेतली होती.

त्यानंतर जवळ जवळ आकरा महिन्यांनी ब्रिटेनच्या पुढाकाराने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनाचा प्रश्न सुटला.

२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमान पद बर्मिंघम शहराला बहाल केल्याचे राष्ट्रकुल खेळ संघटनेचे अध्यक्ष लुईस मार्टिन यानीं पत्रकार परीषेदेत सांगितले,तसेच पुढे ते म्हणाले की आजचा दिवस बर्मिंघम,ब्रिटेन वलराष्ट्रकुल खेळ चळवळी साठी आनंदाचा आहे.

२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धा २७ जूलै ते ७ आँगस्ट २०२२ या काळात घेण्याचे नियोजन आहे.तसेच या नियोजना साठी ८४५ मिलियन युरोज इतका खर्च अपेक्षित आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या ऐथलेटिक क्रीडा प्रकारासाठी अलेक्जेंडर स्टेडियमच्या नुतनीकरणाला लवकरच सुरूवात होईल, असे ब्रिटिश क्रीडा मंत्री ट्रेसी काँर्च यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की ब्रिटेनला मोठ्या क्रीडा स्पर्धेंच्या यशस्वी आयोजनाचा अनुभव असल्याने बर्मिंघम येथील राष्ट्रकुल स्पर्धाही यशस्वीपणे व व्यवस्थित पार पडतील.

– आशुतोष मासगोंडे 

Comments
Loading...
%d bloggers like this: