वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या 10 गोष्टी

पाकिस्ताननचे सध्याचे पंतप्रधान आणि पाकिस्तान क्रिकेटमधील माजी दिग्गज वेगवान गोलंदाज इम्रान खानचा आज (5 आॅक्टोबर) 66 वा वाढदिवस आहे.

इम्रान खान यांनी क्रिकेट बरोबरच राजकारण, लेखक अशी विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.

पाकिस्तानचा यशस्वी कर्णधार असणारा आणि पाकिस्तानला पहिला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार इम्रान खानबद्दल या खास गोष्टी-

-5 आॅक्टोबर 1952 ला इम्रान खान यांचा लाहोर येथे जन्म झाला.

-त्यांचे पूर्ण नाव अहमद खान नियाझी इम्रान असे आहे.

-त्यांचे शालेय शिक्षण एचिसन कॉलेज, लाहोर आणि इंग्लंडमधील रॉयल ग्रामर स्कुल वॉर्सिस्टर येथून झाले आहे. तसेच त्यांनी पदवीचे शिक्षण केब्ले कॉलेज, आॅक्सफोर्ड येथून झाले असून येथे त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.

-इम्रान यांनी लाहोरमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. क्वायद-ए-आझम ट्रॉफीमध्ये ते 1969 मध्ये लाहोर अ संघाकडून सरगोधा विरुद्ध खेळले. या पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी 30 धावा आणि 43 धावांत 2 विकेट्स घेतल्या.

-याबरोबरच त्यांनी आॅक्सफोर्ड युनिवर्यसिटी ब्ल्यू, वोरस्टरशायर, ससेक्स आणि न्यू साउथ वेल्स संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

-त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 22.32 च्या सरासरीने 1287 विकेट्स तर 36.79 च्या सरासरीने 17771 धावा केल्या आहेत.

-इम्रान यांनी 1971 मध्ये 3-8 जून दरम्यान झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात त्यांना एकही विकेट घेता आली नाही. पण फलंदाजी करताना त्यांनी 5 धावा केल्या.

-1982 च्या मोसमात त्यांनी 9 कसोटी सामन्यात तब्बल 62 विकेट्स घेतल्या.

-त्यांनी कसोटीत 3000 धावा आणि 300 विकेट्सचा टप्पा 75 व्या कसोटी सामन्यात पार केला. सर्वात जलद हा टप्पा गाठणारे ते दुसऱ्या क्रमांकाचे अष्टपैलू खेळाडू ठरले होते.

-त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी 88 कसोटी सामन्यात 3807 धावा आणि 362 विकेट्स तर वनडेत 175 सामन्यात 3709 धावा आणि 182 विकेट्स घेतल्या आहेत.

-1982 मध्ये इंग्लंड दौऱ्यात पहिल्यांदाच इम्रान यांनी पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे आणि 28 वर्षांनंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कसोटीत विजय मिळवण्यात पाकिस्तानला यश आले.

-त्यांनी पाकिस्तानचे 48 कसोटी आणि 139 वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे.

-1994 मध्ये त्यांनी मान्य केले ते चेंडूशी छेडछाड करत होते. ज्यामुळे नंतर यावर बरेच वाद झाले.

-1992 चा विश्वचषक पाकिस्तानने इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली जिंकला. या विश्वचषकानंतर इम्रान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आणि राजकारणात प्रवेश केला.

-1992 च्या विश्वचषकाआधी त्यांनी 1987 नंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती पण पाकिस्तानचे मिलिटरी डायरेक्टर झिया उल हक य़ांनी इम्रान यांना पाकिस्तानचे कर्णधारपद स्विकारण्यासाठी विचारले. त्यानंतर क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा इम्रान यांनी पुनरागमन केले.

-इम्रान हे क्रिकेटपटू बरोबरच राजकारणी आणि लेखक आहेत. ते 6 पुस्तकांचे लेखक आहेत.

-इम्रान यांना 2005 ला युनिवर्सिटी आॅफ ब्रॅडफोर्डचे कुलपती (चॅन्सेलर) केले ते 2014 पर्यंत या पदावर होते.

-त्यांच्य़ा आईचे निधन कर्करोगाने झाल्य़ाने त्यांनी आईच्या स्मरणार्थ 29 डिसेंबर 1994 ला शौकत खानम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची स्थापना केली.

-याबरोबरच त्यांनी नमल कॉलेजचीही मियांवाली जिल्ह्यात स्थापना केली.

-1996 मध्ये त्यांनी पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाची स्थापना केली.

-2010 मध्ये त्याच्यावर आधारीत पाकिस्तान प्रोडक्शन हाउसने ‘कप्तान: मेकिंग आॅफ लिजंड’ हा चरित्रपट केला.

-त्यांनी 1995 ला जेमिमा गोल्डस्मिथबरोबर विवाह गेला. मात्र 2004 मध्ये त्यांचा घटस्पोट झाला. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी पत्रकार रेहम खान यांच्याबरोबर विवाह केला पण 10 महिन्यातच त्य़ांचाही घटस्पोट झाला.

-इम्रान यांना ऑक्सफोर्ड युनीवर्सिटीचा हॉल ऑफ फेम्स पुरस्कार मिळाला आहे.

-1985 मध्ये ससेक्स क्रिकेट सोसायटीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार, 1990 ला भारतीय क्रिकेटचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार आणि 1992 ला पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हिलल-इ-इम्तियाझ या पुरस्काराने इम्रान यांचा गौरव झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-