वाढदिवस विशेष- दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमनबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?

क्रिकेट इतिहासातील महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा आज (27 आॅगस्ट) 110 वा वाढदिवस आहे. त्यांनी 20 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केलेले अनेक विक्रम आजही अबाधित आहेत

20 व्या शतकातील दिग्गज फलंदाज म्हणून ओळखले जाणाऱ्या ब्रॅडमन यांनी 1928 ला इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले तर 1948 ते इंग्लंडविरुद्धच शेवटचा कसोटी सामना खेळले.

अशा या महान खेळाडू ब्रॅडमन यांच्याबद्दल या काही खास गोष्टी-

– ब्रॅडमन यांचा जन्म 27 आॅगस्ट 1908 ला झाला असून त्यांचे पूर्ण नाव डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन असे आहे.

-त्यांनी 52 कसोटी सामन्यात 80 डावात खेळताना ब्रॅडमन यांनी 29 शतके आणि 13 अर्धशतकांसह 99.94 च्या सरासरीने 6996 धावा केल्या आहेत.

– 10 वर्षांचे असताना ब्रॅडमन हे स्पर्धात्मक टेनिस खेळायचे.

– पण त्यानंतर त्यांनी वयाच्या 11 व्या वर्षी बॉरल येथील ग्रीन पार्कवर पहिला क्रिकेटचा सामना खेळला ज्यात त्यांनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 55 धावा केल्या.

-त्यानंतर 1 वर्षांनी बॉरल हायस्कुलच्या वरिष्ठ संघाकडून खेळताना त्यांनी त्यांचे क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले.

– 16 डिसेंबर 1927 ला प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात अॅडलेड ओव्हल मैदानात त्यांनी दक्षिण आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 118 धावांची खेळी केली होती. त्यावेळी ते प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणात शतक करणारे ते 20 वे आॅस्ट्रेलियन खेळाडू होते.

–  वयाच्या 20 व्या वर्षी त्यांची आॅस्ट्रेलियाच्या कसोटी संघात निवड झाली. त्यांनी 30 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 1928 दरम्यान पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

-सार्वकालिन कसोटी क्रमवारीतही डॉन ब्रॅडमन 961 गुणांसह अव्वल स्थानी आहेत.

-एकाच कसोटी सामन्यात दोन वेळा शतक आणि शून्य धावेवर बाद होणारे ब्रॅडमन हे एकमेव आॅस्ट्रेलियन खेळाडू आहेत.

-ब्रॅडमन यांची 99.94 ही क्रिकेट इतिहासातील सर्वाच्च फलंदाजी सरासरी आहे. तसेच त्यांच्या जवळपासही कोणत्या फलंदाजाची सरासरी नाही. कसोटी क्रिकेटमध्ये ब्रॅडमननंतर सर्वोच्च सरासरी ही आॅस्ट्रेलियाचे अॅडम वोग्स यांची 61.87 ही सरासरी आहे.

-1930 ला इंग्लंडमध्ये अॅशेस मालिकेत खेळताना त्यांनी 974 धावा केल्या होत्या. याबरोबरच एका कसोटी मालिकेत सर्वाधित धावा करण्याचाही विश्वविक्रम यावेळी त्यांनी केला होता.

-ब्रॅडमन हे आॅस्ट्रेलियाचे 21 वे कसोटी कर्णधार होते.

-1930 च्या इंग्लंड दौऱ्यात त्यांनी वॉर्सेस्टर विरुद्ध एका डावात 236 धावा केल्या होत्या. त्यामुळे ते इंग्लंडमध्ये द्विशतक करणारे सर्वात तरुण फलंदाज बनले होते.

-ते 1940 मध्ये लष्कारात लेफ्टनंटम्हणून दाखल झाले होते. परंतू 1941 ला तीनवेळा फायब्रोसिटिसने ग्रासल्याने त्यांना त्यातून डिस्चार्च देण्यात आला.

-ब्रॅडमन हे कसोटी सामन्यात एकदाही यष्टीचीत झाले नाहीत.

– एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 5000 पेक्षा जास्त धावा करणारे ब्रॅडमन एकमेव फलंदाज आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्ध 5028 धावा केल्या आहेत.

– ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दोनवेळा त्रिशतकी खेळी केली आहे. तसेच ब्रॅडमनच्या या विक्रमाची बरोबरी ब्रायन लारा, ख्रिस गेल आणि विरेंद्र सेहवाग यांनी केली आहे.

-तसेच कसोटीत सर्वाधित द्विशतके करण्याचा विक्रमही ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी कसोटीत 12 द्विशतके केली आहेत.

– मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ब्रॅडमन यांना आदर्श मानत असून त्याने याबद्दल त्याच्या प्लेइंग इट माय वे या आत्मचरित्रातही सांगितले आहे.

-25 फेब्रुवारी 2001 ला वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पीव्ही सिंधूने एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रचला इतिहास

“हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था…. “