वाढदिवस विशेष: सिक्सर किंग ख्रिस गेलबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

आज (21 सप्टेंबर) विंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचा 39 वा वाढदिवस आहे. गेल हा नेहमीच त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे तसेच त्याच्या मनमोकळ्या सेलिब्रेशन स्टाईलमुळे प्रसिद्ध आहे.

टी20 क्रिकेटमध्ये 11 हजारांपेक्षा जास्त धावा करणारा तो पहिलाच आणि एकमेव फलंदाज आहे. टी20 क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम करणाऱ्या या दिग्गज क्रिकेटपटूबद्दल माहित नसलेल्या या काही खास गोष्टी-

1. ख्रिस गेलचा जन्म 21 सप्टेंबर 1979 ला किंगस्टन, जमैका येथे झाला.

2. त्याचे पूर्ण नाव ख्रिस्तोफर हेन्री गेल असे आहे. तर त्याला युनिवर्स बॉस या टोपननावाने ओळखले जाते.

3. गेल त्याच्या कारकिर्दीतील यशाचे श्रेय लूकाज क्रिकेट क्लबला देतो. या क्लबमधून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याच्या सन्मानार्थ, लुकाज क्रिकेट क्लबच्या नर्सरीला त्याचे नाव देण्यात आले आहे.

4. वयाच्या 19 व्या वर्षी 1998-99 ला गेलने जमैकाकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याचवर्षी त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही पदार्पण केले. त्याने युवा आंतरराष्ट्रीय पातळीवर विंडिजचे प्रतिनिधित्वही केले आहे.

3. गेलने आंतरराष्ट्रीय पदार्पण भारताविरुद्ध 11 सप्टेंबर 1999 ला वनडे सामन्यातून केले. त्यानंतर त्याने 2000 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले. त्याने वनडेत पदार्पणाच्या सामन्यात 1 धाव तर कसोटी पदार्पणात 33 धावा केल्या होत्या.

4. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात काहीशी खराब झाली होती. त्याचबरोबर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये त्याला अनियमित हृदयाच्या ठोक्याच्या समस्या उद्भवत होत्या. भारत दौऱ्यावर असताना एका सामन्यात तर तो या त्रासामुळे रिटायर्ड हर्टही झाला होता.

यासाठी त्याने शस्त्रक्रिया करुन घेतली. त्यानंतर त्याला हा त्रास झाला नाही.

5. 2012 मध्ये बांगलादेश विरुद्ध त्याने कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. असे करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला होता.

6. व्यावसायीक क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना पुणे वॉरियर्स विरुद्ध 30 चेंडूत 100 धावा केल्या होत्या.

7. गेल हा वनडे क्रिकेटमध्ये 7000 हजारापेक्षा जास्त धावा आणि 150 पेक्षा जास्त विकेट घेणारा पहिला विंडिजचा क्रिकेटपटू आहे.

8. बेंगलोरमध्ये पार पडलेल्या एका आयपीएल सामन्यादरम्यान गेलच्या षटकारामुळे एका 10 वर्षाच्या मुलीचे नाक फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे सामन्यानंतर गेल तिला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्येही गेला होता.

9. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक, वनडे क्रिकेटमध्ये द्विशत आणि टी20 क्रिकेटमध्ये शतक करणारा गेल हा एकमेव क्रिकेटपटू आहे. तसेच क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक करणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे.

10. कसोटीत दोन वेळा त्रिशतके करणारा गेल एकूण चौथा क्रिकेटपटू. याआधी असा कारनामा डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा आणि विरेंद्र सेहवागने केला आहे.

11. तो ट्वेंटी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत ट्वेंटी 20 क्रिकेटमध्ये 346 सामन्यात 11737 धावा केल्या आहेत. तसेच ट्वेंटी 20 मध्ये 10 हजारांपेक्षा जास्त धावा करणाराही तो एकमेव फलंदाज आहे.

12. त्याचबरोबर तो ट्वेंटी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक अर्धशतके करणाराही फलंदाज आहे. त्याने यात 21 शतके आणि 71 अर्धशतके केली आहेत.

13. गेलच्या नावावर ट्वेंटी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचाही विक्रम आहे. त्याने 346 सामन्यात 863 षटकार मारले आहेत.

14. गेल त्याच्या शाळेतील शिक्षिका जून हेमिल्टन यांना प्रेरणास्थान मानतो. त्याने त्यांना त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यासाठीही उपस्थित आमंत्रण दिले होते.

15. त्याने विंडिजकडून 103 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 42.18 च्या सरासरीने 7214 धावा केल्या आहेत.

16. तो क्रिकेट वनडे विश्वचषकात द्विशतक करणारा पहिला फलंदाज आहे. त्याने 2015च्या विश्वचशकात झिम्बाब्वे विरुद्ध 215 धावा केल्या होत्या.

17. त्याने जमैकामध्ये त्याचा बार सुरु केला असून त्याचे नाव ”ट्रिपल सेंच्यूरी स्पोर्ट्स बार’ असे आहे. तसेच त्याचे किंगस्टन येथे राजेशाही घर असून त्यात चार गॅरेज, दोन स्विमिंग पूल, एक बार, होम सिनेमा अशा गोष्टी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

किदांबी श्रीकांत बरोबरच सिंधूचीही चायना ओपनमध्ये निराशा

वनडेत १० हजार धावा करणारा निवृत्त खेळाडू करतोय पुनरागमन!

विराटला शुन्य तर बजरंगला ८० गुण, तरीही खेलरत्न विराटला कसा?