वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी

१९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेट प्रकाशझोतात आले. त्यावेळी भारताच्या त्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता तो त्यावेळीचे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांनी.

आज(६ जानेवारी) कपिल देव यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यांनी भारताकडून १९७९ चे १९९४ पर्यंत १६ वर्षे क्रिकेट खेळले. यात त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना वनडेमध्ये २२५ सामन्यात २५३ विकेट्स आणि ३७८३ धावा केल्या तर कसोटीमध्ये १३१ सामन्यात ४३४ विकेट्स आणि ५२४८ धावा केल्या.

कपिल देव यांच्याबद्दल या काही खास गोष्टी –

– कपिल देव यांचे पुर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे असून त्यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ मध्ये चंदीगढ येथे झाला. त्यांचे वडील रामलाल हे बिल्डींग आणि टिंबर कॉन्ट्रॅक्टर होते. कपिल देव यांचे पालक भारत-पाकिस्तान फाळणीवेळी रावळपिंडीहून स्थलांतरित झाले होते.

– ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळले असून ते १९७५ ते १९९२ या १७ वर्षांच्या काळात हरियाणा संघाचे नियमित सदस्य होते.

– कपिल यांनी १९८३ च्या विश्वचषकात ३०३ धावा आणि १२ विकेट घेतल्या होत्या. तसेच ८ सामन्यात ७ झेलही घेतले होते. त्याचबरोबर या विश्वचषकात त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध १७५ धावांची नाबाद खेळी देखील केली होती.

-फेब्रुवारी १९९४ मध्ये त्यांनी श्रीलंकेच्या हर्षन तिलकरत्नेची विकेट घेत रिचर्ड हॅडली यांचा ४३१ विकेट्सचा विक्रम मागे टाकला. त्यांनी कारकिर्दीत कसोटीमध्ये ४३४ विकेट घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केले. पण त्यानंतर ८ वर्षे त्यांचा कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अबाधित होता. नंतर तो विक्रम कर्टनी वॉल्श यांनी मोडला.

– कपिल देव हे वनडे क्रिकेटमध्येही सर्वाधित विकेट घेणारे गोलंदाज होते. त्यामुळे डेनिस लिली आणि मुथय्या मुरलीधरन यांच्याप्रमाणेच तेही वनडे आणि कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज होते.

– कपिल देव हे त्यांच्या कसोटी कारकिर्दीत १८४ डावात कधीही धावबाद झालेले नाही. सर्वाधिक सलग डावात धावबाद न होणाचा विक्रम अजूनही त्यांच्या नावावर आहे.

-कपिल देव यांना त्यांच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत कधीही दुखापतीमुळे सामन्यातून वगळण्यात आले नाही.

– ते ऑक्टोबर १९९९ ते ऑगस्ट २००० पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. पण त्यावेळी मॅच फिक्सिंग प्रकरण गाजल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

– त्यांनी त्यांचे तीन आत्मचरित्र लिहिले असून ‘गॉड डेक्री’ हे पहिले आत्मचरित्र १९८५ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर ‘क्रिकेट माय स्टाइल’ हे आत्मचरित्र १९८७ ला प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांनी २००४ मध्ये ‘स्ट्रेट फ्रॉम द हार्ट’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले.

– कपिल देव हे २०१८ आशिया पॅसिफिक सीनियर गोल्फ स्पर्धेतही भारताकडून सहभागी झाले होते.

– कपिल देव हे २००८ मध्ये सन्मानिय लेफ्टनंट कर्नल म्हणून भारतीय आर्मीशी जोडले गेले.

– कपिल देव यांनी काही चित्रपटात गेस्ट अॅपिएरन्स दिला आहे. यात मुझसे शादी करोगी, आर्यन: अनब्रेकेबल, चेन खूली की मेन खूली आणि इक्बाल या चित्रपटांचा समावेश आहे.

– कपिल देव यांनी रोमी हीच्याही विवाह केला आहे. त्यांनी तिला लग्नाची मागणीही अनोख्या पद्धतीने घातली होती. एकदा ट्रेनच्या प्रवासात ट्रेन एका प्रेक्षणीय स्थळी थांबली असताना त्यांनी तीला विचारले होते की तूला आपल्या मुलांना दाखवण्यासाठी या ठिकाणाचा फोटो घ्यायला आवडेल का? त्यावेळी रोमी यांना कपिल काय म्हणाले हे कळायला थोडा वेळ लागला पण त्यानंतर त्यांनी होकार दिला. कपिल आणि रोमी यांना एक मुलगी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर 

आयपीएल २०१९ सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का

चेतेश्वर पुजाराला संघसहकारी का म्हणतात ‘व्हाइट वॉकर’

वाढदिवस विशेष: कपिल देव आणि ४ चेंडूत ४ षटकार…