वाढदिवस विशेष: अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल या ५ खास गोष्टी माहित आहेत का?

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आज (11 आॅक्टोबर) त्याचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताच्या संघात मर्यादित क्रिकेटमध्ये 2016 पासून नियमित सदस्य बनलेल्या हार्दिकने 2017 मध्ये कसोटी संघातही पदार्पण केले.

हार्दिक आयपीएल 2015 आणि नंतर 2016 च्या टी20 विश्वचषकातील बांगलादेशच्या सामन्यानंतर प्रकाश झोतात आला. तो नेहेमी आक्रमक फलंदाजी बरोबरच त्याच्या फॅशनमुळेही चर्चेत असतो.

भारताच्या अष्टपैलू हार्दिक पंड्याबद्दल या काही खास गोष्टी-

-हार्दिकचा जन्म गुजरातमधील चार्यासी येथे 11 आॅक्टोबर 1993 मध्ये झाला.

-हार्दिकच्या कुटुंबाची परिस्थिती ही बेताची होती. पण ही गोष्ट कधीही हार्दिक आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल यांना क्रिकेट खेळण्यापासून थांबवू शकली नाही.

– हार्दिकच्या वडीलांनीही आशा न सोडता बडोदामधील किरण मोरे यांच्या अकादमीमध्ये या दोन भावांना दाखल केले.

– किरण मोरे हे हार्दिक आणि कृणालच्या खेळावर प्रभावित झाल्याने त्यांनी पहिले 3 वर्ष कोणतीही फी या दोघांकडून घेतली नाही.

-शाळेत असताना हार्दिक नववीची परिक्षा अनुत्तीर्ण झाला होता. त्यानंतर त्याने शिक्षण सोडून क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले.

-आयपीएलमध्ये येण्याआधी हार्दिक गुजरातमध्ये विविध स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत होता. ज्यामुळे त्याला कोणत्याही संघासाठी खेळण्याचे 400 रुपये मिळायचे.

-देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात त्याच्याकडे बॅटही नव्हती. त्यामुळे 2014 च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने इरफान पठाणकडे मदत मागितली. इरफाननेही हार्दिकला मदत करत त्याची बॅट दिली होती.

-हार्दिकला 2015 च्या आयपीएल दरम्यान वानखेडे स्टेडीयमवर एका सराव सामन्यावेळी  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला होता की तो जर असाच खेळला तर लवकरच भारतीय संघात पदार्पण करेल.

सचिनचे हे विधान काही महिन्यांमध्येच सत्यात उतरले. हार्दिकने जानेवारी 2016 मध्ये भारतीय संघात स्थान मिळवले.

-हार्दिक हा त्याचे इंग्लिश भाषा सुधारण्याचे श्रेय व्हॉट्सअ‌ॅपला देतो. त्याने इंग्लिश आत्मविश्वासाने बोलण्याचे कारण हे व्हॉट्सअॅप असल्याचे सांगितले होते.

– भारताचा माजी वेगवान गोलंदाज अशिष नेहराने हार्दिकला वेस्ट इंडियन क्रिकेटपटू असे गमतीने म्हटले होते. कारण नेहराच्या मते हार्दिकचे व्यक्तिमत्व आणि त्याचा स्वभाव हा विंडिजच्या खेळाडूंसारखा आहे.

-2016 च्या टी20 विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने रंगतदार ठरलेले शेवटचे षटक टाकले होते. या षटकात बांगलादेशला विजयासाठी 11 धावांची गरज होती. पण याच षटकात बांगलादेशचे 3 फलंदाज बाद झाले.

या षटकातील शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना त्याने आउटसाईड आॅफला शॉर्ट चेंडू टाकला. जो चेंडू बांगलादेशच्या शुवागाता होमला खेळता आला नाही. त्याला एमएस धोनीने धावबाद केले. यामुळे भारत एक धावेने तो सामना जिंकला. या षटकानंतर हार्दिक प्रकाशझोतात आला.

-हार्दिकला मुंबई इंडियन्सच्या संघसहकाऱ्यांनी रॉकस्टार असे टोपन नाव दिले आहे. तर त्याला अनेकजण हॅरी या टोपननावानेही संबोधतात. तसेच सुरेश रैना आणि धोनी यांनी त्याला भारताचा नेमार असे टोपननाव दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-