वाढदिवस विशेष- दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमनबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?

क्रिकेट इतिहासातील महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा आज (27 ऑगस्ट) 111 वा वाढदिवस आहे. त्यांनी क्रिकेटमध्ये 20 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केलेले अनेक विक्रम आजही अबाधित आहेत

20 व्या शतकातील दिग्गज फलंदाज म्हणून ओळखले जाणाऱ्या ब्रॅडमन यांनी 1928 ला इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले तर 1948 ते इंग्लंडविरुद्धच शेवटचा कसोटी सामना खेळले.

अशा या महान खेळाडू ब्रॅडमन यांच्याबद्दल या काही खास गोष्टी-

– ब्रॅडमन यांचा जन्म 27 ऑगस्ट 1908 ला झाला असून त्यांचे पूर्ण नाव डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन असे आहे.

-त्यांनी 52 कसोटी सामन्यात 80 डावात खेळताना ब्रॅडमन यांनी 29 शतके आणि 13 अर्धशतकांसह 99.94 च्या सरासरीने 6996 धावा केल्या आहेत.

– 10 वर्षांचे असताना ब्रॅडमन हे स्पर्धात्मक टेनिस खेळायचे.

– पण त्यानंतर त्यांनी वयाच्या 11 व्या वर्षी बॉरल येथील ग्लेब पार्कवर पहिला क्रिकेटचा सामना खेळला ज्यात त्यांनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 55 धावा केल्या.

-त्यानंतर 1 वर्षांनी बॉरल हायस्कुलच्या वरिष्ठ संघाकडून खेळताना त्यांनी त्यांचे क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले.

– 16 डिसेंबर 1927 ला प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात ऍडलेड ओव्हल मैदानात त्यांनी दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 118 धावांची खेळी केली होती. त्यावेळी ते प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणात शतक करणारे ते 20 वे ऑस्ट्रेलियन खेळाडू होते.

–  वयाच्या 20 व्या वर्षी त्यांची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात निवड झाली. त्यांनी 30 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 1928 दरम्यान पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

– ते ऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारे 21 वे कर्णधार होते.

– ब्रॅडमन कसोटीमध्ये कधीही यष्टीचीत झाले नाही.

-सार्वकालिन कसोटी क्रमवारीतही डॉन ब्रॅडमन 961 गुणांसह अव्वल स्थानी आहेत.

-एकाच कसोटी सामन्यात दोन वेळा शतक आणि शून्य धावेवर बाद होणारे ब्रॅडमन हे एकमेव ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत.

-ब्रॅडमन यांची 99.94 ही क्रिकेट इतिहासातील सर्वाच्च फलंदाजी सरासरी आहे. तसेच त्यांच्या जवळपासही कोणत्या फलंदाजाची सरासरी नाही. कसोटी क्रिकेटमध्ये ब्रॅडमननंतर सर्वोच्च सरासरी ही ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथची आहे. त्याची सरासरी 63.24 आहे.

क्रिडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

बेन स्टोक्समुळे जॅक लीचला कायमस्वरुपी मिळणार मोफत चश्मा, जाणून घ्या कारण

विंडीज विरुद्ध शतकी खेळी करत अजिंक्य रहाणेने मोडला कपिल देव यांचा हा खास विक्रम

जे कोणत्याही आशियाई गोलंदाजाला जमले नाही ते जसप्रीत बुमराहने करुन दाखवले!