धमाकेदार रोहित शर्माचे मोहाली वनडेत १० विक्रम

रोहित शर्माने आज मोहाली वनडेत श्रीलंका संघाविरुद्ध जबदस्त फटकेबाजी करताना अनेक विक्रम केले. ते असे

१.

भारताकडून वनडेत सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा ४थ्या स्थानी. एमएस धोनी(२०८), सचिन तेंडुलकर(१९५), सौरव गांगुली(१८९) आणि रोहित शर्मा(१५५) हे खेळाडू या यादीत अव्वल

४ चेंडूत ४ षटकार खेचणारा झहीर खान नंतर रोहित शर्मा हा दुसरा खेळाडू

कर्णधार म्हणून रोहित शर्माने दुसऱ्याच वनडेत शतकी खेळी केली. भारताकडून केवळ सचिन तेंडुलकरने कर्णधार म्हणून पहिल्याच वनडेत शतक केले आहे.

वनडेत रोहित शर्माचे हे ६वे शतक आहे. विराट कोहलीच्या सर्वाधिक शतकांची बरोबरी. दुसऱ्या स्थानावर ४ शतकांसह  बाबर आझम

२०१५नंतर वनडेत रोहित शर्माचे ११वे शतक. डेविड वॉर्नर १२ शतकांसह अव्वल तर विराट कोहली ११ शतकांसह दुसऱ्या स्थानावर

भारताकडून सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (४९), विराट कोहली(३२), सौरव गांगुली(२२) आणि रोहित शर्मा (१६) हे या यादीतील खेळाडू

भारतीय सलामीवीर म्हणून वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरा. अव्वल स्थानी ४५ शतकांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तर दुसरया स्थानी १९ शतकांसह सौरव गांगुली. सेहवाग(१४) आणि रोहित शर्मा(१४) संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी

वनडेत सचिन(१९९६ आणि १९९८ ) आणि सौरव गांगुली (२०००) यांच्यानंतर वर्षात ६ शतके करणारा केवळ तिसरा भारतीय सलामीवीर

कमी डावात १६ शतके वनडेत भारतीय संघासाठी करणारा रोहित तिसरा खेळाडू. ११० डावात विराट कोहलीने तर १५१ डावात सौरव गांगुलीने ही कामगिरी केली आहे. रोहितला १६७ डावात ही कामगिरी करता आली आहे.

१०

वनडेत भारतात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित (८०) एमएस धोनीनंतर(११९) दुसरा

११

जागतिक क्रिकेटमध्ये वनडेत १५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर(५), डेविड वॉर्नर(५)सह अव्वल

१२
भारतीय खेळाडूने एका वर्षात वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता रोहित शर्मा(४१)च्या नावावर. सचिनने १९९८मध्ये ४० तर २००मध्ये गांगुलीने ३५ षटकार खेचले होते.

१३.
रोहित शर्मा हा २०१३, २०१४, २०१५, २०१६ आणि २०१७मध्ये भारताकडून वनडेत एका डावात सर्वोच्च स्कोर करणारा खेळाडू ठरला आहे.

१४
वनडेत १७५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा ३वेळा करणारा रोहित शर्मा सचिन आणि मार्टिन गप्टिलनंतरचा तिसरा खेळाडू ‘