आयपीएलच्या मध्यावर मुंबई इंडियन्सला बसला मोठा धक्का…

आयपीएल 2019 ची स्पर्धा आता मध्यावर आली आहे. अनेक संघाचे 7 ते 8 सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी सर्वाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. अशातच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

त्यांचा युवा वेगवान गोलंदाज जोसेफ अल्झारी खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या या 12 व्या मोसमातून बाहेर पडला आहे. त्याला 13 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळताना चौकार अडवताना ही दुखापत झाली.

याबद्दल पीटीआयला सुत्रानी सांगितले की ‘त्याला खांद्याची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या आयपीएल मोसमातून बाहेर पडला आहे.’

जोसेफला मुंबई संघात दुखापतग्रस्त ऍडम मिलने ऐवजी घेतले होते. त्यानेही त्याची निवड योग्य ठरवत 6 एप्रिलला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करताना 12 धावांतच 6 विकेट घेत इतिहास रचला होता. तो आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा गोलंदाज ठरला होता.

त्यानंतर झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध मात्र त्याला एकही विकेट घेतला आली नाही. तसेच आयपीएल पदार्पणानंतर लगेचच त्याला आठवड्याभरातच दुखापत झाली असल्याने आता या मोसमातून बाहेर पडावे लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

२०१९ विश्वचषकासाठी बांगलादेश संघाची घोषणा, एकही वनडे न खेळलेल्या खेळाडूला मिळाली संधी

हे चार गोलंदाज विश्वचषकासाठी भारतीय संघाला देणार नेटमध्ये सराव…

या विश्वचषकात धोनी-दिनेश कार्तिकमुळे होणार एक खास योगायोग