त्या गोलंदाजाने केली एकाच षटकात दोन्ही हाताने गोलंदाजी !

 

क्रिकेट हा खेळ सुरु होऊन अनेक वर्ष झाली. रोज काहीतरी नवीन गोष्ट या खेळात घडत असते. त्यामुळे प्रेक्षक, खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञ यांच्यासाठी कायमच काहीतरी नवीन खाद्य मिळत असते.

अगदी आज या खेळातील नावीन्य संपून नेहमीसारखं काहीतरी घडेल असं वाटत असताना काहीतरी नवीन जे कधीही घडलं नाही असं घडत आणि त्याची या क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा होते.

असाच काहीच घडलं आहे ते बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथे चालू असेल्या सामन्यात. या सामन्यात २४ वर्षीय अक्षय कर्णेवार या गोलंदाजाने ६ षटकांत ५९ धावा देत १ विकेट घेतली. तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. परंतु असे करताना त्याने आज चक्क एकाच षटकात दोन हातानी गोलंदाजी केली.

महाराष्ट्रातील वाघोली येथे जन्म झालेला अक्षय विदर्भ रणजी संघाचा सदस्य आहे. त्याने स्थानिक क्रिकेटमध्येही दोन्ही हाताने गोलंदाजी केली आहे. आज ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यातही त्याने असेच काहीसे केल आणि चेपॉईकच्या या मैदानावर आपल्या वेगळ्या शैलीत गोलंदाजी करत त्याने ट्रेव्हिस हेड ला बाद केले.

डावखुरे फिरकी गोलंदाज नागपूरमध्ये दुर्लभ आहे. त्यामुळे ऑफ-स्पिनर म्हणून क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या अक्षयने गोलंदाजीचा हात बदलला, त्याच्या प्रशिक्षकांनी असे करण्यास भाग पाडले.

१७ लिस्ट अ क्रिकेट सामन्यात त्याने ३४ आणि १३ टी -२० सामन्यात १० बळी घेतले आहेत.