वेगाचा बादशाह उसेन बोल्ट करणार फिफा विश्वचषकात या संघाला पाठींबा

वेगाचा बादशाह उसेन बोल्ट फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाला सपोर्ट करत आहे. त्याला विश्वास आहे की लियोनल मेस्सी संघाला विजयाकडे नेईल.

14 जूनपासून 21व्या फिफा विश्वचषकाला रशियात सुरूवात होत आहे. ही स्पर्धा सुमारे एक महिना चालणार आहे. सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

यातच अर्जेंटिनाला या स्पर्धेच्या विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. तसेच अर्जेंटिनाबरोबरच  ब्राझिल, स्पेन, जर्मनी आणि फ्रांस हे संघानाही हा विश्वचषक जिंकण्याची तेवढीच इच्छा आहे.

1978 आणि1986ला अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक जिंकला आहे. त्यानंतर मात्र त्यांच्या हाती निराशा आली. अर्जेंटिनाचा संघ आईसलॅंड, क्रोएशिया आणि नायजेरिया यांच्यासोबत ड गटात आहे.

“मी अर्जेंटिनाचा चाहता आहे”, असे आठ वेळेचा ऑलिपिंक चॅम्पियन बोल्ट म्हणाला.

“आपण जर चांगले खेळलो तर जिंकण्याची तेवढीच चांगली संधी प्राप्त होते. याच संधीचा योग्य तो फायदा उचलला तर अंतिम फेरीत जाऊन जिंकूही शकतो. मी सध्या हा विश्वचषक बघण्यासाठी उत्सुक आहे”,असेही तो म्हणाला.

रशियात होणाऱ्या या स्पर्धेत जास्त गोल व्हावे अशी बोल्टची इच्छा आहे. ब्राझिल विषयी बोलताना तो म्हणाला, “मी नेमारचे पुनरागमन बघितले आहे. त्याने आल्यानंतर दोन गोल केले आहेत.”

“त्याने स्वत:ला योग्य सिद्ध केले आहे. म्हणूनच हा विश्वचषक आधीच्या विश्वचषकांपैकी खूप चांगलाच होणार आहे. ही स्पर्धेतील सामने अटीतटीचे होणार असून यामध्ये जास्त गोल होऊ शकतात. तुमच्यासारखाच मी पण याचा आनंद घेण्यासाठी तयार आहे.”

अर्जेंटिनाचा पहिला सामना 16 जूनला आईसलॅंड विरूद्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

शुज नसण्याची गोष्ट खोटी, या कारणामुळे भारताने फिफा विश्वचषकात खेळण्याची संधी गमावली होती!

बापरे ! जगातील ४४ टक्के लोकांनी पाहिली होती ही स्पर्धा

सुनील छेत्रीचा भारतीय फुटबाॅल संघासाठी मास्टर प्लॅन तयार!