युवराज खेळत असलेल्या लीगचा सामना बाॅंम्बच्या अफवेने पुढे ढकलला

क्रिकेटमध्ये अनेकदा सामन्यात नैसर्गिक अपत्तींमुळे व्यत्यय येतो पण शुक्रवारी ग्लोबल कॅनडा टी20 स्पर्धेत मॉन्ट्रियल टायगर्स विरुद्ध विनीपेग हॉक्स संघातील सामन्यात बाॅंम्बच्या अफवेने व्यत्यय आला होता. या सामन्याला तब्बल 90 मिनीट्स उशीर झाला होता.

काही वृत्तांच्या नुसार स्टेडियमच्या आवारात संशयास्पद पॅकेज सापडले होते. त्यामुळे बाँबच्या शक्यतेने सामन्याला उशीर झाला. दोन्ही संघाच्या खेळाडूंनाही मैदानात येण्यापासून थांबवले होते. तर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनाही स्टेडीयमबाहेर वाट पहावी लागली.

बाँबच्या शोधासाठी श्वानपथकही बोलवण्यात आले होते. या सामन्याला उशीर झाल्याबद्दल स्पर्धेच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरुन ट्विट करण्यात आले की ‘काही तांत्रिक अडचणींमुळे सामन्याला उशीर झाला.’

सामना दिडतास उशीरा सुरु झाल्यानंतर प्रत्येकी 12 षटकांचा करण्यात आला. या सामन्यात जॉर्ज बेली कर्णधार असलेल्या मॉन्ट्रियल टायगर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 12 षटकात 3 बाद 135 धावा केल्या. त्यांच्याकडून सुनिल नारायणने 30 चेंडूत 59 धावांची खेळी केली. तर अँटॉन डेव्हिसिचने 23 चेंडूत 40 धावा केल्या.

नंतर 136 धावांचा पाठलाग करणाऱ्या विनीपेग हॉक्स संघाला 12 षटकात 5 बाद 111 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना 24 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

या लीग स्पर्धेमध्ये युवराज सिंग, फाफ डु प्लेसिस, ख्रिस गेल, बेली, ब्रेंडन मॅक्यूलम, किरॉन पोलार्ड असे अनेक आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटू खेळतात.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

असे मिळणार कसोटी विश्वचषकात संघांना गुण

असे आहे टीम इंडियाचे कसोटी विश्वचषकाचे वेळापत्रक

टीम इंडियाला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मिळणार नवीन ट्रेनर