कर्ज फेडण्यासाठी मी माझ्या विम्बल्डन ट्रॉफी विकणार नाही- बोरिस बेकर

६वेळचा ग्रँडस्लॅम विजेता बोरिस बेकर हे कर्ज फेडण्यासाठी आपली विम्बल्डन ट्रॉफी विकणार असल्याची बातमी स्वतः बेकर यांनी फेटाळली आहे. दोन दिवसांपूर्वी ते त्यांच्या विम्बल्डन ओपनच्या ट्रॉफी कर्ज फेडण्यासाठी विकणार असल्याची बातमी आली होती.

बोरिस बेकर या टेनिस खेळाडूवर ५४ मिलिअन डॉलर कर्ज आहे.

तीन वेळच्या विम्बल्डन ओपन विजेता असणाऱ्या बोरिस बेकरने श्रीमंत जीवनशैली जगण्यासाठी आणि आपल्या अपयशी व्यवसायामुळे स्वतःला कर्जत लोटले आहे.

तीन वेळा विम्बल्डन जिंकल्यानंतर बोरिस हे जगातील श्रीमंत खेळाडूंपैकी एक होते. परंतु त्यांनी मित्रांकडून, बँकेतून त्यांच्या व्यवसायासाठी, पहिल्या पत्नीमुळे, प्रेयसीसाठी कर्ज काढले होते.

आता त्यांना ते कर्ज फेडावे लागणार आहे. त्यासाठी ते त्यांच्या विम्बल्डन ट्रॉफी विकणार आहे अश्या बातम्या आल्या होत्या. परंतु त्यांनीच जॉनी ग्रीनवुड यांचे एक ट्विट रिट्विट करून सांगितले आहे की ते विम्बल्डन ट्रॉफी विकणार आहे हे वृत्त चुकीचे आहे.

 

बोरिस बेकार हे विम्बल्डन ओपन स्पर्धा जिंकणारे सर्वात युवा खेळाडू आहे. त्यांनी १९८५ ला वयाच्या १७ व्या वर्षी त्यांची पहिली विम्बल्डन ट्रॉफी जिंकली होती. तीन विम्बल्डनसह सहा ग्रँड स्लॅम विजेतेपदे त्यांनी मिळवली आहेत.