कालच्या सामन्यानंतर ही खास आकडेवारी पुढे आली

बेंगलोर । काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या वनडेत भारतीय संघाला २१ धावांनी पराभूत व्हावे लागले. परंतु या सामन्यानंतर एक खास आकडेवारी पुढे आली आहे. भारतीय संघ हा जगातील पहिला संघ बनला आहे ज्याने धावांचा पाठलाग करताना तब्बल २१ वेळा ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

यापूर्वी हा विक्रम संयुक्तपणे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. दोनीही संघांनी यापूर्वी २०वेळा वनडेत धावांचा पाठलाग करताना ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

गमतीशीर आकडेवारी अशी आहे की ३०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ १०वेळा विजयी आणि १० वेळा ३०० पेक्षा जास्त धावा करूनही पराभूत झाला आहे.