विराट कोहली सेना कंट्रीजमध्ये कमनशीबीच, नकोसा विक्रम झाला नावे

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध कारकिर्दीतील 25वे कसोटी शतक केले. त्याचे हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7वे कसोटी शतक ठरले आहे.

ऑस्ट्रेलिया बरोबरच कोहलीने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड येथे खेळताना कसोटीमध्ये शतके केली आहेत. या देशांमध्ये त्याने 27 सामने खेळताना 11 शतके केली असून त्यातील फक्त एका शतक केलेल्या सामन्यात भारताला विजय मिळवता आला. हा विजय इंग्लंड विरुद्ध मिळवला आहे.

यामध्ये चार शतके केलेले सामने अनिर्णीत राहिले तर उर्वरित सहा शतकांच्या सामन्यात भारत पराभूत झाला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध कोहलीने दोन शतके केली आहेत.

कोहली आतापर्यत 75 कसोटी सामन्यात खेळताना 54.23च्या सरासरीने 6508 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 25 शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे.

कोहलीने या चार देशांमध्ये 27 सामन्यात 50.33च्या सरासरीने 2668 धावा केल्या आहेत. तर भारताकडून या देशांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यामध्ये तो चौथ्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पीटर सिडलने ५ दिवस आधीच सांगितला तिसऱ्या कसोटीचा निकाल

युवराज सिंग या कारणामुळे आयपीएल २०१८मध्ये झाला होता अपयशी…

भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक

मी आयपीएलमध्ये एवढाही काही वाईट खेळलो नाही- जयदेव उनाडकट