सेंच्युरियन कसोटीत १०६ वर्षांनी रचला गेला नवा इतिहास, मुरली विजय बनला इतिहासाचा साक्षीदार

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात जे १०६ वर्षात आफ्रिकेत घडलं नाही ते काल घडलं. १९१२ सालानंतर कसोटीच्या पहिल्या डावात गोलंदाजीची सुरुवात फिरकी करण्याची दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील पहिलीच गोष्ट होती.

जेव्हा केशव महाराज या गोलंदाजाने काल मुरली विजय या भारतीय सलामीवीराला पहिला चेंडू टाकला तो एक ऐतिहासिक चेंडू ठरला. यापूर्वी १९१२ साली ऑब्रे फॉकनर या फिरकी गोलंदाजाने पहिल्या डावात गोलंदाजी केली होती.

विशेष म्हणजे २००० नंतर प्रथमच आफ्रिकन फिरकी गोलंदाजाने आफ्रिकेत गोलंदाजीची सुरुवात केली. पॉल ऍडम या गोलंदाजाने २०००मध्ये केपटाउन कसोटीत इंग्लंड संघाविरुद्ध गोलंदाजीची सुरुवात दुसऱ्या डावात केली होती.