अबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स !

सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये राजस्थानचा गोलंदाज अनिकेत चौधरीने विरोधी संघांच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. या स्पर्धेत त्याने सहा सामन्यांच्या पाच डावांमध्ये चार वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

काही महिन्यापासून ढिसाळ कामगिरी करणाऱ्या चौधरीला यावर्षीच्या रणजीमध्ये लय सापडली आहे. या हंगामात त्याने 17च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे प्रथम श्रेणीमध्ये त्याच्या 53 सामन्यात 26च्या सरासरीने 168 विकेट्स झाल्या आहेत.

चौधरीने उत्तर प्रदेश विरुद्ध पाच विकेट्स, आसाम विरुद्ध दोन डावांमध्ये प्रत्येकी पाच विकेट्स आणि ओडिसा विरुद्ध पाच विकेट्स घेतल्या आहेत. तसेच झारखंड विरुद्ध दोन, जम्मू काश्मिर विरुद्ध दोन आणि सर्व्हिस विरुद्ध दोन डावांमध्ये मिळून पाच विकेट्स घेतल्या आहेत.

याआधी चौधरी राष्ट्रीय संघातील स्थानासाठी तो प्रमुख दावेदार समजला जात होता. त्याला संघनिवड अधिकाऱ्यांनी सरावासाठीही बोलावले होते. त्यावेळी त्याने उत्तम फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीने हैराण केले होते.

तसेच चौधरीची ही कामगिरी बघून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये त्याला संधीही दिली होती. मात्र तो सामने खेळलाच नाही. त्याने आयपीएलमध्ये पाच सामने खेळले असून यात त्याने पाच विकेट्स घेतल्या आहेत.

चौधरीचा हा फॉर्म राजस्थानसाठी लाभदायक तर ठरला आहे पण भारतीय संघासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. भारतीय संघाला सुरूवातीपासूनच डाव्या हाताच्या गोलंदाजांची कमतरता भासत आली आहे. तसेच त्याला जर भारतीय संघात स्थान मिळाले तर तो खलिल अहमद नंतरचा राजस्थानचा दुसरा खेळाडू ठरेल. अदमह हा भारताकडून मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

जेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय?

मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी

सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल!