न्यूझीलँडच्या ह्या गोलंदाजाला वाटते भारत वेगवान गोलंदाजीसमोर हार मानेल

मुंबई । न्यूझीलँडचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर म्हणतो की भारतासारख्या बलाढ्य संघाला हरवण्यासाठी आमच्या गोलंदाजांना वेगाने गोलंदाजी करावी लागणार आणि भारताच्या फलंदाजांनी चुकीचा फटका खेळण्याची वाट बघावी लागणार.

न्यूझीलंडचा भारत दौरा हा २२ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे ज्यात दोन्ही संघ ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यात आमने सामने येणार आहेत.

“भारताविरुद्ध गोलंदाजी करणे कठीण आहे, ते फिरकी गोलंदाजांविरुद्ध उत्तम खेळतात. ते लहानपणापासूनच फिरकी गोलंदाजांना खेळत मोठे झाले आहेत. वेगाने गोलंदाजी करायची आणि फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडायचे असा आमचा प्लान आहे. भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध जो फॉर्म राहिला आहे तो अप्रतिम आहे. आम्हाला जिंकण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल.”

हार्दिक पंड्या बद्दल काय प्लान आहे असे विचारले असता तो म्हणाला.

” हार्दिक पंड्या एक चांगला स्ट्राइकर असून तो पुढे येऊन चांगले फटके मारू शकतो. चेंडू जेवढा त्याच्यापासून लांब ठेवता येईल तेवढे त्याला फटके मारण्यास त्रास होतो. मी त्याला अॅडम झाम्पाला एक षटकात ३ षटकार मारताना पाहिले आहे. जर तुम्ही त्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो फटका मारण्याच्या नादात बाद होऊ शकतो. परंतु तो खूप चांगला स्ट्राइकर आहे, म्हणूनच आम्हाला सावध रहावे लागेल.”