…..म्हणून केदार जाधवला मिळू शकते विश्वचषक 2019 मध्ये खेळण्याची संधी

एशिया कप स्पर्धेत फलंदाज म्हणून संघात स्थान मिळालेला केदार जाधव फिरकी गोलंदाज म्हणून उभारी घेत आहे. केदारला एशिया कपमध्ये फक्त दोनदा फलंदाजीची संधी मिळाली होती, त्यात त्याने 47 धाव केल्या होत्या.

पण गोलंदाज म्हणून त्याने चमकदार कामगिरी करत सहा सामन्यात 8 विकेट मिळवल्या. एशिया कप स्पर्धेत सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत 8 वे स्थान मिळवले. केदारने आपल्या ऑफ ब्रेक गोलंदाजीने फलंदाजांना चकित केले आहे.

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात केदारने मेहदी हसन आणि मुश्फिकीर रहीम यांना बाद करत त्यांच्या डावाला खिंडार पाडले होते. मधल्या फळीतील भागीदारी तोडण्यासाठी तो महत्वाची भूमिका बजावत आहे.

मधल्या फळीतील फलंदाजाची भूमिकाही तो व्यवस्थित बजावू शकतो. या सर्व गोष्टींचा करता केदार जाधव 2019 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून महत्वाचा खेळाडू ठरवू शकतो.

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात त्याला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले होते. केदार आपल्या दुखापतीची काळजी घ्यावी लागणार आहे. नुकतीच त्याची शस्त्रक्रिया देखील झाली आणि त्यातून पूर्णपणे बरा झाल्यावर त्याला एशिया कपमध्ये घेण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दोन मोठ्या खेळाडूंचा संघात समावेश

विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शिखर धवनला डच्चू?

विंडिज विरुद्ध कोहलीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; काय आहे कारण जाणून घ्या