Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो

एशिया कप २०१८ या स्पर्धेत काल(२५ सप्टेंबर) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात औपचारीक सामना झाला. त्याचे कारण भारत स्पर्धेतील अंतिम सामन्यात आधीच पोहचला आहे. तर अफगाणिस्तान हा स्पर्धेतून बाद झालेला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडूंना विश्रांती दिली गेली होती. या सामन्यात भारताचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे होते. धोनी हा कर्णधार म्हणून आपला २०० वा वन-डे सामना खेळत होता.

२०० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा धोनी हा पहीलाच कर्णधार ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा आॅस्ट्रेलियाचा रिकी पाॅन्टिंग आणि न्युझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग नंतर तिसरा ठरला आहे.

या सामन्यादरम्यान फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने धोनीला क्षेत्ररक्षणात बदल करायला सांगितले. धोनी त्याच्या विंनतीकडे दुर्लक्ष करत त्याला गोंलदाजी करशील की गोलंदाज बदलू असे सुनावले. हा सगळा प्रकार स्टम्प माइकमध्ये रेकाॅर्ड झाला. त्यानंतर सोशियल माध्यमांवर यावर बरीच चर्चा झाली.

कुलदीपने या सामन्यात १० षटकात ३८ धावा देत २ विकेट मिळवल्या. त्याने अफगाणिस्तानचा कर्णधार असघर अफगाण आणि शाहीदी यांना बाद केले.

महत्वाच्या बातम्या –

-जडेजाच्या नावावर नकोसा विक्रम, यापुर्वीही केलायं असा कारनामा

Video: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार

टीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण