क्रिकेटपटू मिचेल स्टार्कच्या भावाला राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट | आॅस्ट्रेलि्याचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या भावाला राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. उंच उडीत ब्रॅंडन स्टार्कने ही सुवर्ण कामगिरी केली आहे.

डाव्या हाताला दुखापत झालेली असतानाही २.३२ मीटर उंच मारली. सर्व स्पर्धंकांत अशी कामगिरी करणारा तो एकमेक खेळाडू ठरला. 

तब्बल २४ वर्षांनी अर्थात १९९४ नंतर प्रथमच आॅस्ट्रेलियाला उंच उडीत हे पदक जिंकले आहे. २४ वर्षीय ब्रॅंडन स्टार्कने जमल विल्सन आणि डीजंगो लोवेटला पराभूत करत ही कामगिरी केली. त्याने २०१५मध्ये विश्वचषकात २.३१मीटर उडी मारली होती. 

सध्या ब्रॅंडनचा मोठा भाऊ मिचेल स्टार्क हा दुखापतीमूळे बाहेर आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दुखापतग्रस्त ठरल्यामूळे अायपीएलमधूनही बाहेर गेला आहे. 

भावाचा अभिमान वाटतो असा ट्विट करत मिचेल स्टार्कने ब्रॅंडनचे कौतूक केले आहे.