१०० पेक्षा जास्त सामने खेळलेल्या दोन खेळाडूंना भारताविरुद्धच्या मालिकेतून डच्चू

भारताविरूद्ध  21 सुरू होणाऱ्या वन-डे मालिकेतून विंडिजच्या ड्वेन ब्रॅव्हो, किराॅन पोलार्ड आणि सुनिल नारायण यांना  वगळण्यात आले आहे. भारताविरूद्धच्या वन-डे मालिकेसाठी विंडिजच्या 25 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये या तिन्ही खेळाडूंचे नाव समाविष्ट करण्यात आलेली नाही.

कॅराबियन लीगमधील विजेत्या त्रिनिदाद नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व केलेला ड्वेन ब्रॅव्होला भारताविरूद्धच्या टी-20 मालिकेत देखील स्थान देण्यात आलेली नाही.

क्रिकेट विंडिजचे मुख्यकार्यकारी अधिकारी जाॅनी ग्रेव यांनी सांगितले की ” भारत दौऱ्यातील वन-डे मालिकेसाठी 25 जणांच्या संभाव्य खेळाडूंची निवड केली आहे”.

अंतिम संघानिवड जरी अजून झाली नसली तरी यातूनच अंतिम खेळाडूंची निवड होणार आहे. विंडिजमधील सुपर 50 (50 षटकांचे) सामने 3 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. त्यातील कामगिरीच्या आधारे संघ निवड होणार आहे.

”सुपर 50 सामन्यांत चांगली कामगिरी न करू शकलेल्या पोलार्ड आणि नारायणला त्यामुळे संघात स्थान देण्यात अडचणी आहेत. अष्टपैलू ब्राॅव्होच्या जागी संघात अॅन्ड्रू रसेल, पोलार्ड, कार्लस ब्रेथवेट, रोव्हमन पाॅव्हेल हे पुरेसे पर्याय उपलब्ध आहेत. सुपर 50 च्या सामन्यांत चांगली केल्यानंतर ड्वेनला संघात मिळू शकते”, असेही जाॅनी ग्रेव यांनी सांगितले.

भारताविरूद्ध 4 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत कॅराबियन लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-