गौतम गंभीरने दिला दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा, हा असेल नवा कर्णधार

नवी दिल्ली – दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीरने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०१८ च्या  उरलेल्या सामन्यासांठी श्रेयस अय्यरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
आयपीएलच्या ११ मोसामातील आतापर्यंतच्या झालेल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सततच्या होणाऱ्या पराभवामुळे गौतमने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
गंभीरने सांगितले की, “ज्या स्थितीत आपला संघ आहे त्यासाठी मी जबाबदार असून, कर्णधार म्हणून पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचे गौतम म्हणाला. त्यासोबतच तो म्हणाला की कोणताही खेळाडू संघापेक्षा मोठा नाही त्यामुळे मी जरी संघाचा कर्णधार नसलो तरी मी सतत संघासाठी उभा असेन.” 
 
– सचिन आमुणेकर