तब्बल ३ वर्षांनी हा दिग्गज खेळाडू परतणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये

झिम्बाब्वे संघाची विंडीज संघाबरोबर होणाऱ्या २ कसोटी सामन्यांसाठी निवड झाली आहे. यात झिम्बाब्वे संघात ब्रेंडन टेलर आणि कयिल जार्विस यांचे पुनरागमन झाले आहे.

याबद्दल झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरून माहिती दिली.

इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी ब्रेंडन टेलर आणि कयिल जार्विसने ३ वर्षांसाठी कोलपाक करार केला होता. त्यामुळे मार्च २०१५ पासून ब्रेंडन टेलर तर ऑगस्ट २०१३ पासून कयिल जार्विस झिम्बाब्वे संघासाठी खेळले नाही. हा करार संपवून आता ते पुन्हा संघात परत येत आहेत.

आपल्या संघातील पुनरागमनाविषयी टेलरने ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो “जवळजवळ ३ वर्षांपूर्वी मी झिम्बाब्वे संघासाठी शेवटची कसोटी खेळली होती. पुढच्या ४ दिवसात मी झिम्बाब्वे क्रिकेटचे आणि माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.”

ब्रेंडन टेलरने झिम्बाब्वेकडून खेळताना २३ कसोटीत ४ शतके आणि ७ अर्धशतके केली आहे तर १६७ वनडेत ८ शतके आणि ३२ अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर कयिल जार्विसने ८ कसोटीत गोलंदाजी करताना ३० बळी घेतले आहेत तर २४ वनडेत २७ बळी घेतले आहेत.

ब्रेंडन टेलर हा आयपीएलमध्ये हैद्राबाद सनरायझर्स कडून खेळत होता.

झिम्बाब्वे संघ: ग्रामी क्रेमेर(कर्णधार),रेगीस चाकाबवा,चामु चिभाभा,मायकेल चिनोया, तेंडाई चिसोरो,क्रेग एरवीन,कयिल जार्विस, हॅमिल्टन मस्कॅडझा,न्याशा मायावो,सोलोमन मिरे, क्रिस्तोफर म्पोफू,पीटर मूर, सिकंदर रजा, ब्रेंडन टेलर, मालकॉम वॉलर, सीन विल्यम्स.