भारताला एकवेळ नडलेला क्रिकेटपटू आता होणार प्रशिक्षक!

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्यूलम आयपीएलमधील कोलकता नाईट रायडर्सचा सहाय्यक प्रशिक्षक आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिनबॅगो नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी सज्ज झाला आहे.

मॅक्यूलमने काही दिवसांपूर्वीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार त्याने त्रिनबॅगो आणि कोलकता या दोन्ही संघांची मालकी असलेल्या नाईट रायडर्स फ्रान्चायझीबरोबर पुढील मोसमासाठी करार केला आहे.

मॅक्यूलम 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या यूरो टी20 स्लॅम लीगमध्ये खेळणे अपेक्षिक होते पण त्याने निवृत्ती घेताना या लीगमधूनही माघार घेतली आहे.

कॅरिबियन प्रीमीयर लीग 5 सप्टेंबरपासून सुरु होत असल्याने दोन्ही लीगच्या तारखा जवळपास एकाच वेळी येत आहेत आणि त्रिनबॅगो संघ मॅक्यूलमला प्रशिक्षक म्हणून घेणार असल्याने मॅक्यूलमने यूरो टी20 स्लॅम लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.

याबरोबरच मॅक्यूलमनेही निवृत्ती घेताना प्रसिद्धीपत्रकात तो पुढे मीडिया आणि प्रशिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे म्हटले होते.

मॅक्यूलमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून फेब्रुवारी 2016 ला निवृत्ती घेतली होती. तसेच त्याने कोलकता नाईट रायडर्सकडून आयपीएलच्या पहिल्या मोसमात खेळताना पहिल्याच सामन्यात 158 धावांची तुफानी खेळी केली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विलियम्सनने चालू सामन्यात चाहत्यांबरोबर असा साजरा केला वाढदिवस, पहा व्हिडिओ

…म्हणून युवराज सिंगच्या संघाने दिला बसमध्ये चढण्यास नकार

१९ वर्षीय ‘द्विशतकवीर’ शुबमन गिलने गंभीरच्या १७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला दिला धक्का