ब्रायन लारा ४००

इंग्लंड मध्ये १८ व्या शतकापासून क्रिकेट खेळले जात होते पण आंतरराष्ट्रीय स्थरावर त्याला मान्यता ही १९व्या शतकात मिळत गेली. क्रिकेटला खूप मोठा इतिहास आहे.१९ व्या शतकात क्रिकेटला पूरक नाव मिळाले होते ते म्हणजे वेस्ट इंडीज. सर विवियन रिचर्ड्स ,सर गॅरी सोबर्स ,बोर्डेन ग्रिनिच ,मायकेल मार्शल हे ते धुरंधर होते ज्याच्यामुळे क्रिकेटला अफाट लोकप्रियता लाभली. त्यांच्यापैकी एक पण त्यांचा पुढील पिढीतील महान खेळाडू ब्रायन चार्ल्स लारा. नवीन पिढीला विराट-अनुष्का यांचाच इतिहास माहीत.
ब्रायन लाराने आपल्या टेस्ट करियरची सुरुवात ६ डिसेंबर १९९०रोजी केली . त्या वेळेस कोणी विचारही केला नसेल की हा खेळाडू पुढे जाऊन एवढा मोठा महान खेळाडू होईल आणि जागतिक क्रिकेटमधील कितीतरी रेकॉर्ड आपल्या नवे करेल. १२ एप्रिल रोजी लाराने असाच एक मोठा रेकॉर्ड आपल्या नवे केला त्याचा हा आढावा!


वेस्ट इंडीज संघाची १९९४ ची परिस्तिथी खूप चांगली होती ,यात साहेबांनी वेस्ट इंडीजचा दौरा ठरवला . या दौऱ्यातील ५ व्या टेस्टमध्ये पहिल्या डावात खेळताना ब्रायन लाराने ३७५ धावांची रेकॉर्ड ब्रेक खेळी केली .त्याने सर गॅरी सोबर्स यांचाच ३६ वर्षांपूर्वीचा ३६५ धावांचा विक्रम मोडीत काढला . हा टेस्ट सामना अनिर्णित राहिला.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा विक्रम ऑस्ट्रेलिया कसा त्यांचा नावावर राहू देणार होता ,पण हा विक्रम मोडणे म्हणजे सुईत दोरा ओवण्या इतका सोपा नव्हता ,तो एक धावांचा डोंगर होता जो मोडणे जवळ जवळ अशक्य होते. पण तोपर्यंत क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियन मेथथव हेडन नावाच वादळ आले होते .त्याने ९ ऑक्टोबर २००३ ला झिम्बॉबवे विरुद्ध खेळताना ३८० धावा बनवून मोडून काढला .

 


लारा शांत बसणाऱ्या मधला नव्हता त्याला तोच विक्रम परत त्याचा नावावर हवा होता. २००४ साली परत साहेबानी वेस्ट इंडिज दौरा करण्याचे ठरवले यात ४ टेस्ट मॅच होत्या. पण या वेळचा वेस्ट इंडिजचा संघ इतका मातब्बर नव्हता .पाहिल्या ३ कसोटीमध्ये वेस्ट इंडिज संघ हारला . ज्यात कर्णधार असूनही लाराने फक्त १०० धावा काढल्या होत्या. त्याला स्वतःलाही सिद्ध करायचे होते. सामना होता अँटिगुआच्या त्याच सेंट जॉन्स मैदानावर जिथे त्याने एप्रिल १९९४ मध्ये साहेंबांविरुद्ध ३७५ धावांची खेळी केली होती. वेळ पुन्हा तिथेच आली. एप्रिलचाच महिना आणि फूल बनण्यासाठी पुन्हा साहेबच. तीन कसोटीतील अपयश धुवून काढत त्याने प्रथमतः कसोटी मालिकेत शतक पूर्ण केले. मधल्या फळीतील फलंदाजांना घेऊन बघता बघता व्दिशतक पूर्ण केले सामन्याचा तिसऱ्या दिवशी त्रिशतक पूर्ण केले.प्रेक्षकांना उत्सुकता होती कि तोच आता किती धावा बनविणार कारण पाहिले त्रिशतक केले तेव्हा त्याने सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला होता आता पण तो त्याची पुनर्वती करणार का हा विचार प्रेक्षक आणि क्रिकेट पंडित करू लागले.आता तोच बॉलशी खेळत नव्हता तर इंग्लंडच्या गोलंदाजांच्या मानसिकतेशी खेळत होता .वेगवान गोलंदाजाला ऑफ ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राइव तर सेप्पीनेरला पुढे सरसावत सिक्स मारत होता. बघता बघता त्याने हेडनचा ३८० धावांचा विक्रम मोडीत काढला. ३९९ वर गेल्या नंतर सुंदर पॅडलस्वीपचा फटका मारत एक धाव घेतली आणि टेस्ट इतिहासातील वयक्तिक ४०० धावांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. या खेळीत त्याने ४३ चौकार तर ४ षटकार मारले.
ती होती चौथी टेस्ट ,चौथा महिना, साल २००४ आणि धाव ४००. हा विक्रम करत असताना बाकी अनेक विक्रमांशी तो जोडला गेला. सर्वाधिक मिनिटे खेळपट्टीवर राहण्याच्या विक्रमामध्ये तोच ७ व्या स्थानावर राहीला ,सर्वाधिक बॉल खेळण्याच्या यादीत तो ११ व्या स्थानावर राहील .असे अनेक विक्रम त्याचा नावावर त्या दिवशी जोडले गेले.