२० वर्षीय रिषभ पंतबरोबरील ‘पंगा’ स्टुअर्ट ब्राॅडला पडला महागात

नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.

या सामन्यातील तिसऱ्या दिवशी केलेल्या चुकिच्या कृतीमुळे स्टुअर्ट ब्राॅडला सामन्यातील १५% फी आणि एक डेमेरिट पाॅंईंट देण्यात आला आहे.

आयसीसी आचारसंहितेच्या नियम २.१७ प्रमाणे ब्राॅड हा दोषी आढळला. फलंदाज बाद झाल्यावर त्या अयोग्य भाषा वापरणे किंवा हावभाव करणे यासाठी हा दंड केला जातो.

सप्टेंबर २०१६ पासुन आयसीसीची नविन आचारसंहीता सुरु झाली असुन त्यात ब्राॅडला मिळालेला हा पहिलाच डेमेरिट पाॅंईंट आहे.

जेव्हा तिसऱ्या दिवशी ९२व्या षटकांत रिषभ पंत बाद झाला तेव्हा ब्राॅड त्याच्याकडे चालत गेला आणि त्याला अयोग्य भाषा वापरली. यामुळे फलंदाजाकडूनही त्याच प्रकारची प्रतिक्रीया येण्याची शक्यता होती. हे खेळाच्या नियमात बसत नसल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

सामनाधिकारी जेफ क्रो यांच्यासमोर ब्राॅडने आपली चुक मान्य केली असुन सुनावलेली शिक्षा कबूल केली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम

केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी

सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?