जसप्रीत बुमराह टी२० मध्ये अव्वल !

आज आयसीसीने टी२० क्रमवारी जाहीर केली. यात गोलंदाजी क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान पटकावले. तसेच भारतीय कर्णधार विराट कोहली फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या या क्रमवारीत कोहली आणि बुमराह सोडले तर एकही फलंदाजाला आणि गोलंदाजाला पहिल्या दहामध्ये स्थान नाही. केएल राहुल फलंदाजीत क्रमवारीत २० व्या स्थानी आहे. तसेच आर अश्विन गोलंदाजी क्रवारीत १५ व्या स्थानी आहे.

अष्टपैलूंच्या यादीतही एकही भारतीय खेळाडूला पहिल्या दहात स्थान नाही. या यादीत कोहली १२ व्या स्थानी आहे तर युवराज सिंग १५ व्या तर सुरेश रैना १८व्या स्थानी आहेत. या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसन अव्वल स्थानी आहे.

जसप्रीत बुमराहने अव्वल स्थानी झेप घेतल्याबद्दलचे ट्विट केले आहे. यात त्याने त्याच्या कुटुंबाचे आणि संघाचे आभार मानले आहेत.