पुणे मॉन्सून अश्वशर्यती हंगाम २०१९: बुशटॉप्सने आजचा दिवस गाजवला

पुणे। पुणे मॉन्सून अश्वशर्यती हंगाम 2019 या स्पर्धेत बुशटॉप्स या घोड्याने 2000मीटर अंतरावरच्या द ईव्ह चॅम्पियन ट्रॉफी या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी द ईव्ह चॅम्पियन ट्रॉफी या महत्वाच्या लढतीत फाईव्ह स्टार्स शिपिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी मिस्टर व मिसेस विजय शिर्के, जय शिर्के व के.एन.धंजीभॉय यांच्या मालकीच्या बुशटॉप्स या घोड्याने 2 मिनिट 4 सेकंद व 742 मिनिसेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. याचा एन.एस.परमार हा जॉकी होता, तर एम.के.जाधव ट्रेनर होता.

सविस्तर निकाल
द युनिकॉर्न प्लेट क्लास V
विजेता: पावर ऑफ थोर, उपविजेता: डेझल एन डेज;

द कोलंबियाना प्लेट क्लास V
विजेता: माय प्रिशियस, उपविजेता: जेगर बॉम्ब;

द टू द मेनॉर बेरोन प्लेट
विजेता: बीमर, उपविजेता: पोलारीस;

द पी हॅडो ट्रॉफी
विजेता: एडलीन, उपविजेता: हार्मोनी ऑफ द सी;

द ईव्ह चॅम्पियन ट्रॉफी
विजेता: बुशटॉप्स, उपविजेता:ऍडजुडीकेट