भुवनेश्वर कुमारला मिळाली लाईफ पार्टनर ! 

दिल्ली । भारतीय संघात सध्या सार्वधिक फॉर्ममध्ये असलेल्या भुवनेश्वर कुमारने काल आपल्या भविष्यातील पत्नीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. भुवी म्हणून क्रिकेटप्रेमींना माहित असलेल्या भुवीने एका रोमँटिक डिनरच्या वेळीचा दोघांचा खास फोटो शेअर केला आहे.

भुवीच्या सहचारिणीचे नाव हे नुपूर नागर असे आहे. भुवनेश्वर कुमारला यासाठी इंस्टाग्रामवर अनेक शुभेच्छा मिळत आहेत. याचवर्षी ११ मे रोजी भुवीने एक फोटो शेअर केला होता ज्यात नुपूरचा चेहरा दिसणार नाही याची त्याने काळजी घेतली होती.

Dinner date 😊 full pic soon 😉

A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi) on

विशेष म्हणजे भुवीने तेव्हा तो फोटो अर्धाच शेअर केला होता, आता तोच फोटो ज्यात ते दोघे आहेत असा त्याने शेअर केला आहे. यापूर्वी भुवीचे नाव अनुस्मृति सरकार या अभिनेत्रींबरोबर घेतले जात होते. दोघांना एकत्र पहिले देखील होते. परंतु त्या सर्व शंकांना पूर्णविराम देत भुवीने काल सरळ फोटो शेअर करून सर्व चर्चाच बंद केली आहे.

Here’s the better half of the picture @nupurnagar 😊😍

A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi) on

असं सांगितलं जात की नुपूर नोएडा, दिल्ली येथे जॉब करत असून ती इंजिनीअर आहे. ती आणि तिचे कुटुंब याच शहरात राहत असून भुवी आणि नुपूर अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या दोघांचा साखरपुडा झाला असून ह्या वर्षी डिसेंबर महिन्यात ते लग्न करू शकतात.