पहा: असं बर्थडे सेलेब्रेशन आपण पाहिलं नसेल!

कॅरेबियन प्रीमियर लीग आणि सेलेब्रेशन या अशा गोष्टी आहेत जो कोणताही क्रिकेटप्रेमी टाळू शकत नाही. अगदी सामन्यादरम्यान पाऊस जरी आला तरी त्या वेळेत खेळाडू, समालोचक आणि चाहते डान्स करून एक खास सेलेब्रेशन करतात.

परंतु काल एक वेगळंच सेलेब्रेशन पाहायला मिळाल. सीपीएल अर्थात कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिबंगो नाईट रायडर्स या संघाचे प्रशिक्षक असलेल्या सायमन कॅटीच यांच्या वाढदिवसाच काल असं काही सेलेब्रेशन झालं कि विचारू नका.

याचा संपूर्ण विडिओ त्रिबंगो नाईट रायडर्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध करण्यात आला. ड्वेन ब्रावो कर्णधार असलेल्या या संघाने सायमन कॅटीच यांचा वाढदिवस चक्क एका स्विमिंग पूलवर साजरा केला. यावेळी केक कापून झाल्यावर सायमन कॅटीच यांना थेट स्विमिंग पूलमध्ये ढकलण्यात आले. त्यात कर्णधार ड्वेन ब्रावो हा आघाडीवर होता.

कॅटीच यांनी आपल्याला स्विमिंग पूलमध्ये खेळाडूंनी ढकलू नये म्हणून नारळाच्या झाडाला पकडलं. परंतु सुनील नारायण आणि ड्वेन ब्रावो यांनी तरीही त्यांना तेथून दूर करत पाण्यात ढकललंच.

पहा संपूर्ण विडिओ: