भारत ठरणार का चॅम्पियन ?

भारत २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ आहे आणि ही चॅम्पियन्सची प्रतिष्ठा भारताला जर कायम राखायची असेल तर इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा २०१३ सारखाच खेळ करणे गरजेचे आहे. २०१३ मध्ये भारताची सलामीची जोडी म्हणजेच शिखर धवन आणि रोहित शर्मा भलत्याच फॉर्ममध्ये होते त्यामुळे त्यावेळी फॉर्ममध्ये नसलेल्या विराट कोहलीवर जास्त दबाव आला नव्हता. तसेच जडेजाने वेळोवेळी विकेट्स घेऊन भारताला सामने जिंकवले होते. आता २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ही कामगिरी कोण करणार हे पाहावे लागेल. भाराच्या स्टार फलंदाजांचा आयपीएलमध्ये फॉर्म एवढा काही खास राहिला नाही त्यामुळे भारताला आता गोलंदाजानकडून अपेक्षा आहेत.

भारताची ताकद

गोलंदाजी – होय, या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची जमेची बाजू फलंदाजी नसून गोलंदाजी आहे. भारताकडे या स्पर्धेत जाताना ६ विशेषज्ञ गोलंदाज आहेत. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा तर ऑफ स्पिनर म्हणून आर.आश्विन आहे. स्विंग गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार तर वेगवान गोलंदाजीसाठी उमेश यादव आणि मोहम्मद शमी आहेत. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून उदयास आलेला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराचा ही संघात समावेश आहे.

सराव सामान्यतील यश – भारताला आपल्या दोनही सराव सामन्यात चांगले यश मिळाले आहे. न्यूझीलँड विरुद्ध फिरकी गोलंदाजांनी चमक दाखवली तर बांग्लादेश विरुद्ध वेगवान गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली. धवनने आयपीएलमधील फॉर्म कायम राखला तर दिनेश कार्तिकने मिळालेल्या संधीच सोन करत सराव सामन्यात चांगली फटकेबाजी केली.

भारतीय संघाच्या कमतरता

एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फॉर्म – आयपीएल आणि त्याआधी झालेल्या ऑस्ट्रलियाच्या मालिकेत विराटचा फॉर्म काही चांगला नव्हता , विराट भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. सलामीच्या फलंदाजांनी जर नांगी टाकली तर विराटने डाव पुढे नेला पाहिजे अशी अपेक्षा भारताला विराटकडून आहे. धोनी आता बेस्ट फिनिशेर राहिला आहे का नाही यावर बऱ्याच क्रिकेट जाणकारांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तसेच रोहित शर्मा दुखापतीनंतर बऱ्याच दिवसांनी आंतररराष्ट्रीय मैदानावर खेळणार आहे, आयपीएलमधेही त्याचा फॉर्म एवढा काही चांगला नव्हता.

अश्विनची गोलंदाजी – आयपीएलच्या पूर्ण मोसमाला मुकलेल्या अश्विनला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामान्यपासूनच चांगली कामगिरी करण्याचे आवाहन आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने चांगली गोलंदाजी केली होती पण त्याला आता जवळजवळ २ महिने झाले त्यामुळे आता तोच कशी गोलंदाजी करतो यावर सर्वांचे लक्ष आहे.

महास्पोर्ट्सची भविष्यवाणी – अंतिम फेरी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत नक्कीच अंतिम सामान्यपर्यंत मजल मारेल असे दिसत आहे. भारत २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ आहे त्या संघाचं नेतृत्व धोनीने केल होत आणि आता विराट भारताच नेतृत्व करणार आहे. विराट आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच भारतचे नेतृत्व करत आहे. तसे त्याने भारताला २००८ चा अंडर १९ चा वर्ल्डकप स्वतःच्याच नेतृत्व खाली जिंकून दिलेला आहेच.

भारताचा संघ

फलंदाज – रोहित शर्मा, शेखर धवन, विराट कोहली , केदार जाधव, अजिंक्य राहणे.

अष्टपैलू – युवराज सिंग, हार्दिक पांड्य, रवींद्र जडेजा.

यष्टीरक्षक – महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक.

फिरकी गोलंदाज – आर अश्विन.

वेगवान गोलंदाजी – भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद शमी.

भारतचे सामने –

जून ४ भारत विरुद्ध पाकिस्तान, बर्मिंघम

जून ८ भारत विरुद्ध श्रीलंका, लंडन

जून ११ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, लंडन