आयपीएलमधील पैशांवर खेळाडूंची गुणवत्ता ठरू शकत नाही- सौरव गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आयपीएलवर कठोर भाष्य करताना खेळाडूंची खरी किंमत ही आयपीएल लिलावातील किंमतीवर ठरू शकत नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

“आयपीएलच्या लिलावातील मूल्य खेळाडूंच्या क्षमतेचे खरे प्रतिबिंब नाही. प्रत्येक खेळाडूच्या प्रसिद्धीवर आयपीएलमधील त्या खेळाडूची किंमत अवलंबून असते”, असे वक्तव्य भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरभ गांगुलीने यांनी केले आहे.

“तुम्ही आयपीएलच्या पैश्यावर आधारित कुठल्याही खेळाडूची पात्रता ठरवू शकत नाही. 54 (आंतरराष्ट्रीय) शतके केलेल्या हाशिम आमलाला एकही संघ विकत घेत नाही त्याच वेळी रणजी ट्रॉफीचा एकच सामना खेळणाऱ्या ईशान किशनला मात्र 6.2 कोटी रुपये दिले जातात. म्हणून आयपीएलला कुठल्याही खेळाडूची पात्रता ठरवण्याचा अधिकार नाही” असेही ते पुढे म्हणाले.

प्रसिद्ध क्रीडा पत्रकार देबाशीश दत्ता यांनी तयार केलेल्या शेलीज क्रिकेट इयर बुकच्या 20 व्या आवृत्तीचे उद्घाटन करत असताना माजी कर्णधार सौरभ गांगुली बोलत होते.

आयपीएलमध्ये कुठलाही तर्क नाही ती एक मागणी आहे. जयदेव उनाडकत हा एक असा खेळाडू आहे कि ज्यांनी एक कसोटी, सात एकदिवसीय आणि चार ट्वेन्टी -20 सामने खेळले आहेत तरीही त्याला राजस्थान रॉयल्सने 11.5 कोटी रुपये खरेदी केले आहे. ” असे ते पुढे म्हणाले.