धोनीच्या नावावर होऊ शकतो हा मोठा विक्रम

कॅप्टन कूल अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आज भारताकडून ३००वा वनडे सामना खेळणार आहे. चौथ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना तो एक मोठा विक्रम करू शकतो. जर धोनीने आज एक अर्धशतकी खेळी केली तर तो सचिन, गांगुली आणि द्रविड या दिग्गजांच्या यादीत सामील होऊ शकतो.

धोनी आजपर्यंत ४६३ आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्याने त्यात १५५२१ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ९९ अर्धशतके केली आहेत. हा एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी फक्त १०० पेक्षा जास्त अर्धशतके केली आहेत. अशी कामगिरी करायला धोनीला आता फक्त एका अर्धशतकाची गरज आहे.

धोनीने या मालिकेत तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी आहे. मालिकेतील चौथा सामना आज होणार आहे. त्यामुळे या सामन्यात धोनीला हा विक्रम करण्याची सुवर्ण संधी आहे.

भारताकडून सार्वधिक आंतराराष्ट्रीय अर्धशतके करणारे खेळाडू
१६४ सचिन तेंडुलकर, सामने-६६४
१४५ राहुल द्रविड, सामने-५०४
१०६ सौरव गांगुली, सामने-४२१
९९ महेंद्रसिंग धोनी, सामने-४६३
७९ मोहम्मद अझरुद्दीन, सामने-४३३
७३ विराट कोहली, सामने-२९८