आज ७३ धावा केल्या तर धोनी सामील होणार सचिन, द्रविड, गांगुली सारख्या दिग्गजांच्या यादीत

भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल अशी ओळख असणारा एमएस धोनीने आज जर ७३ धावांची खेळी केली तर तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली वीरेंद्र सेहवाग यांच्यानंतर सर्व प्रकारचे क्रिकेट मिळून भारताकडून सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू होऊ शकतो.

चौथ्या सामन्यात जर धोनीने श्रीलंकेविरुद्ध जर ७३ धावा केल्या तर एकदिवसीय, कसोटी टी२० सामने मिळून भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी सचिन, द्रविड, गांगुली,सेहवाग पाठोपाठ पाचव्या स्थानी येणार आहे. सध्या धोनीच्या नावावर १५५२१ धावा आहेत तर माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर १५५९३ धावा आहेत.

भारताकडून तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
३४३५७ सचिन तेंडुलकर
२४०६४ राहुल द्रविड
१८४३३ सौरव गांगुली
१६८९२ वीरेंद्र सेहवाग
१५५९३ मोहम्मद अझरुद्दीन
१५५२१ एमएस धोनी
१४७५२ विराट कोहली