एकमेव टी-२०: नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी निवडली !

आर.प्रेमदासा मैदानावर आज भारताच्या श्रीलंका दौऱ्याच्या शेवटचा सामना होणार आहे. हा एकमेव टी-२० सामना भारताने जर जिंकला तर श्रीलंकेवर घरच्या मैदानावर सलग ९ आंतरराष्ट्रीय सामने हरण्याची नामुष्की ओढवणार आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाचे सावट या सामन्यावर असणार आहे आणि त्यामुळे सामना १५ मिनिट उशिरा सुरु होणार आहे. त्यामुळे प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फायदा होणार असे भारतीय कर्णधार विराट कोहलीचे मात आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीचा हा ५०वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

हे आहेत दोनीही संघाचे ११ खेळाडू

श्रीलंका : निरोशान डिकवेल , उपुल थरंगा (कर्णधार), दिलशान मुनावीर, आशान प्रियजन, अँजेलो मॅथ्यूज, दसुन शानूक, प्रसन्ना सर्च, थिसारा परेरा, अकिला दानंजय, लसिथ मलिंगा, इश्यूवार उडाना

भारत : रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (वाय), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बूमरा, यज्वेंद्र चहल, कुलदीप यादव