पर्थ कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंचा आॅस्ट्रेलिया संघ जाहीर

पर्थ। उद्यापासून(14 डिसेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. हा सामना पर्थमधील आॅप्टस स्टेडीयम या नवीन मैदानावर होणार आहे.

या सामन्यासाठी आज(13 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाने अंतिम 11 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. त्यांनी अॅडलेड ओव्हलवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील संघच कायम ठेवला आहे.

त्यामुळे आॅस्ट्रेलिया संघ फक्त मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लिआॅन या चार गोलंदाजांसह पहिला कसोटी सामना खेळणार आहे.

तसेच पुन्हा एकदा उपकर्णधार मिशेल मार्शला वगळण्यात आले आहे. त्यामुळे या सामन्यातही आॅस्ट्रेलियाचा संघ अष्टपैलू खेळाडूशिवाय मैदानात उतरणार आहे.

या आॅस्ट्रेलियाच्या संघात अॅडलेडमधील खराब कामगिरी नंतरही अॅरॉन फिंचला संधी देण्यात आली आहे. त्याच्यावर कर्णधार टीम पेनने विश्वास व्यक्त करत त्याला पाठींबा दिला आहे.

यामुळे आॅस्ट्रेलियाची वरच्या फळीत अॅरॉन फिंच, मार्क्यूस हॅरिस, उस्मान ख्वाजा असतील, तर मधल्या फळीत शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, टीम पेन असणार आहेत.

आॅस्ट्रेलिया या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-1 अशा फरकाने पिछाडीवर आहे. पहिला सामना भारताने 31 धावांनी जिंकला आहे.

असा आहे 11 जणांचा आॅस्ट्रेलिया संघ- 

अॅरॉन फिंच, मार्क्यूस हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, टीम पेन(कर्णधार, यष्टीरक्षक) पॅट कमिंन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, नॅथन लिआॅन.

महत्त्वाच्या बातम्या:

कर्णधार कोहलीला पर्थची हिरवी खेळपट्टी पाहून टेन्शन ऐवजी झाला आनंद…

मोठी बातमी – मुंबईकर रोहित शर्मा, आर अश्विन पर्थ कसोटीला मुकणार

एमएस धोनीवर सुनील गावसकर पाठोपाठ या दिग्गज क्रिकेटपटूचाही हल्लाबोल