विराट कोहलीचे ‘कजरा रे’ गाण्यावर थिरकले पाय

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या त्याला मिळालेल्या सुट्यांची मजा घेताना दिसून आला आहे. नुकताच त्याचा त्याच्या मित्राच्या लग्नात केलेल्या डान्सचा व्हिडीओ वायरल झाला आहे.

त्याने बंटी अँड बबली सिनेमातील कजरा रे गाण्यावर डान्स केला आहे. तसेच या लग्नासाठी त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि तिचे आई वडीलही उपस्थित होते. विराटच्या या कजरा रे गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे.

या लग्नासाठी विराट बरोबरच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवननेही हजेरी लावली होती.

सध्या विराटला श्रीलंकेत आज पासून सुरु होणाऱ्या तिरंगी टी २० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.

तसेच विराटने नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अफलातून कामगिरी केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने या दौऱ्यात वनडे आणि टी २० मालिका जिंकून इतिहास रचला होता.