हे आहेत आयपीएल २०१८ चे कर्णधार

पुढील महिन्यात आयपीएलच्या ११ व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आयपीलच्या चर्चा क्रिकेट वर्तुळात चांगल्याच रंगू लागल्या आहेत. यावर्षी आयपीएल संघांची पुनर्बांधणी करण्यात आल्याने चाहत्यांना अनेक नवीन चेहेरे यावर्षी दिसणार आहेत.

तसेच अनेक संघांनी त्यांचे कर्णधारही बदलले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी किंग्स इलेव्हन पंजाबने तर आज कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या नवीन कर्णधारांची नावे जाहीर केली आहेत.

पंजाब संघाचा आर अश्विन नवीन कर्णधार असणार आहे तर कोलकाता संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिक सांभाळेल. तसेच राजस्थान रॉयल्स संघाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथकडे संघाची जबाबदारी सोपवली आहे.

मागील काही वर्ष कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करणारा आणि त्यांना २ विजेतीपदे मिळवून देणारा गौतम गंभीर यावर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसेल.

या संघांव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघांचे मागील मोसमाचेच कर्णधार यावर्षीही कायम असतील. तर दोन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व त्यांचा नियमित कर्णधार एम एस धोनीच करेल.

आयपीएलच्या या ११ व्या मोसमासाठी आयपीएल फ्रॅन्चायझींनी अनुभवी खेळाडूंपेक्षा तरुण खेळाडूंवर जास्त विश्वास दाखवताना अनेक देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना संघात सामील करून घेतले आहेत. त्यामुळे यावर्षी चाहत्यांना अनेक अनोळखी तरुण खेळाडूंना खेळताना बघण्याची संधी मिळणार आहे.

हे आहेत आयपीएल २०१८ चे कर्णधार

चेन्नई सुपर किंग्स – एम एस धोनी
रॉयल चालेंगर्स बंगलोर – विराट कोहली
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा
दिल्ली डेअरडेव्हिल्स – गौतम गंभीर
किंग्स इलेव्हन पंजाब – आर अश्विन
सनरायझर्स हैद्राबाद – डेव्हिड वॉर्नर
कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक
राजस्थान रॉयल्स – स्टीव्ह स्मिथ